Header Ads

सलाम त्यांचे कार्याला .....


सलाम त्यांचे कार्याला .....

करोना पोसिटीव्ह वार्डात आपली अविरत सेवा देणारी, 

सौ प्रतीक्षा प्रवीण जोशी

(शब्दांकन आशिष बंड जैन)

        करोना चे संकट दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रत्येक दिवशी शासन प्रशासन हे नवीन नवीन सूचना सर्वांना देत आहेत. आणि सर्वच सूचनेचा सार किंवा सूर एकच आहे , तो म्हणजे घरात रहा, विनाकारण बाहेर उडू नका, कुणाच्या संपर्कात येऊ नका. कारण तुम्हालाही कल्पना येणार नाही की तुम्ही कधी  करोना संक्रमित व्हाल. पण अशाही परिस्थितीत असे काही लोकं आहेत की ज्यांना आपले कर्तव्य हे बाजावेच लागते. आणि त्यात ज्यांचा प्रथम क्रमांक लागतो तो म्हणजे आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांचा.
         सौ प्रतीक्षा प्रवीण जोशी  त्यापैकीच एक. आपल्या कारंजातील प्रसिद्ध फोटो ग्राफर प्रवीण जोशी यांच्या त्या पत्नी आहेत. सौ प्रतीक्षा या अकोला येथे शासकीय जिल्हा रुग्णालयात सध्या कोविड 19 पोसिटीव्ह वार्ड मध्ये आपली सेवा अविरत देत आहेत. त्यांच्या या असामान्य व जोखीमयुक्त सेवेला मानाचा मुजरा. जिथे फक्त करोना च्या भीतीने आपली गाळण उडत आहे, तिथे या संपूर्ण करोना पोसिटीव्ह वार्ड मध्ये आपल्या कर्तव्यावर आहेत. आपले पती, आपला छोटा दहा वर्षाचा मुलगा व आप्तपरिवर सोडून एकट्याच अकोला येथे कार्यरत आहेत. ही आपल्या कारंजेकरांसाठी त्यांच्याप्रति अत्यन्त अभिमानाची व आदराची बाब आहे.
         त्यांचे अश्या सेवेवर राहणे ही जरी त्यांच्या कर्तव्याचा भाग असला तरी तुलनात्मक त्यांचा हे सर्व करण्याच्या मानसिकतेची प्रशंसा करण्यायोग्य आहे. आपला पती, मुलगा व परिवारापासून लांब राहून करोना ग्रस्त रुग्णांना आपली सेवा देणे, त्यांची सर्वोतोपरी काळजी घेणे , त्यांच्या आरोग्याच्या सुधारन्यासाठी योग्य त्यांच्यावर उपचार करणे , स्वतःच्या वैयक्तिक गोष्टीचा त्याग करणे, खण्यापिण्यावर निरबन्ध घालणे, ह्या सर्व गोष्टी करतांना आपल्या मनाची खंबीरता जपणे म्हणजे दिव्यच.
         सौ प्रतीक्षा जोशी सारखे समर्पित सेवा देणाऱ्या सारख्यांकडे बघून आपण घराबाहेर पडण्याचा आपल्यावर निरबन्ध घालून शासन प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे. आपण आपल्या परिवारात, मुळंबाळात राहून, बाहेर न निघता त्यांना एकप्रकारे सहकार्यकच करू शकतो आणि हीच त्यांच्याप्रती आपली भावना सुद्धा समजावी.
         सौ प्रतीक्षा प्रवीण जोशी यांना गुरुमहाराज हे सर्व करण्यास शक्ती प्रदान करो व त्यांचे आरोग्य सुद्धा अबाधित राही हीच आम्हा कारंजेकरांकडून प्रार्थना व अपेक्षा.
सौ प्रतीक्षा प्रवीण जोशी, आपल्या कार्याला आमचा मानाचा मुजरा.!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.