Header Ads

० मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे जाणार विधान परिषदेवर


० मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे जाणार विधान परिषदेवर 

० विधीमंडळाच्या सदस्यांच्या वेतनात होणार ३०% कपात 

० महाराष्ट्र दिन ध्वजारोहण कार्यक्रम साधेपणाने होणार 

० निवारा केंद्रामध्ये भोजनाची क्षमता वाढविणार 

मुंबई (महासंवाद द्वारा) दि. ०९ - मुंबई, दि. ९ : आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

राज्यपाल नियुक्त एका जागेसाठी शिफारस

कोरोनाचे संकट पाहता विधानपरिषदेची निवडणूक होणार नाही अशी परिस्थिती आहे. राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या दोन जागा रिक्त आहेत, त्यापैकी एका जागेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नाव राज्यपालांना शिफारस करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत  घेण्यात आला.

सर्व विधिमंडळ सदस्यांच्या वेतनात ३० टक्के कपात

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता राज्यातील सर्व विधिमंडळ सदस्य, लोकप्रतिनिधींच्या वेतनात या महिन्यापासून म्हणजे एप्रिल २०२० पासून पुढील वर्षापर्यंत म्हणजे एप्रिल २०२१ पर्यंत ३० टक्के वेतन कपात करण्याचा निर्णय झाला.

ध्वजारोहण साधेपणाने करणार

१ मे रोजी राज्यभरात होणारे ध्वजारोहण हे केवळ पालकमंत्री, जिल्हाधिकारी व निवडक मान्यवरांच्या उपस्थितीतच होईल.  कुठलाही समारोह किंवा परेड होणार नाही असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

निवारा केंद्रांमध्ये भोजनाची क्षमता वाढविणे

कोरोना संदर्भात राज्यातील वाढते रुग्ण लक्षात घेता लॉकडाऊनची अंमलबजावणी अधिक कडक करण्याबाबत तसेच निवारा केंद्रांमध्ये भोजन, शिवभोजन यांची क्षमता अधिक वाढविणे व लाभार्थी नागरिकांना अधिक चांगली सुविधा देणे. याबाबत मंत्रिमंडळातील सदस्यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या, याची देखील काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

No comments

Powered by Blogger.