Header Ads

वाशिम जिल्ह्यात विनाकारण फिरणाऱ्या वर पोलिसांची धडक कारवाई

नागरिकांचे जिवित्व रक्षणार्थ कायदे पालन करवून घेण्यास वाशिम जिल्ह्यात खुद्द एसपी व एएसपी उतरले रस्त्यावर

वाशिम जिल्ह्यात विनाकारण फिरणाऱ्या वर पोलिसांची धडक कारवाई  

176  वाहन जप्त तर 200 व्यक्तिंवर गुन्हे दाखल

            वाशिम (जनता परिषद) दि.०9 - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतंच असून वाशिम जिल्ह्यात एक रुग्ण आढळला आहे. त्याच बरोबर शेजारी असलेल्या बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यात रोजचं कोरोना बाधित रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे लोकांनी प्रशासन व शासनाने दिलेले आदेशांचे पालन करावे हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून नागरिकांचे जिवित्व रक्षणार्थ कायदे पालन करवून घेण्यास खुद्द वाशिमचे एसपी व एएसपी उतरले रस्त्यावर उतरले आहे. वाशिमचे जिल्हा पोलिस अधिक्षक श्री वसंत परदेशी व सहाय्यक जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.पवन बनसोड यांनी आता रस्त्यावर उतरून कायद्याचे पालन करविणेसाठी जेणेकरुन नागरिकांचे जिवित्व अबाधीत राहील, नागरिकांमध्ये संसर्ग न होता कोरोना ह्या वैश्‍विक महामारी पासून त्यांचे रक्षण होईल यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणीसाठी सर्वच प्रयत्न चालविले आहेत. 
           खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या वेळा सकाळी 8 ते 12 पर्यंत केल्या आहेत. जिल्ह्यातील नागरिक 12 नंतर विनाकारण गर्दी करताना दिसत आहेत. म्हणून वाशिम जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाणे कारवाईला सुरुवात केली असुन 176 वाहन जप्त केले असून, 200 हुन अधिक जनावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी  व सहाय्यक  पोलीस अधीक्षक डॉ.पवन बनसोड यांनी स्वता रस्त्यावर येऊन ही धडक कारवाई करून नागरिकांना लॉक डाऊन चे नियम पाळत घरातच राहण्याचे  आवाहन केले आहे.

No comments

Powered by Blogger.