Header Ads

अधिकारी, कर्मचारी यांनी जिल्ह्यातच राहणे आवश्यक


 जिल्ह्याबाहेरून ये-जा करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची माहिती कळवा

जिल्हाधिकारी हृषिकेश मोडक यांचे आदेश 

 अधिकारी, कर्मचारी यांनी जिल्ह्यातच राहणे आवश्यक

वाशिम, दि. २८ (जिमाका) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. मात्र, तरीही काही शासकीय, निमशासकीय अधिकारी शासकीय सुट्टीच्या दिवशी तसेच दररोज जिल्ह्याबाहेरून ये-जा करीत आहेत. अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांची माहिती पोलीस विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिल्या आहेत.
लॉकडाऊन काळात सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी जिल्ह्यातच राहणे आवश्यक आहे. तरीही काही अधिकारी, कर्मचारी कार्यालयाच्या ओळखपत्राच्या आधारे जिल्ह्याबाहेरून ये-जा करीत आहेत. यापुढे अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांना जिल्ह्यात प्रवेश देण्यात येवू नये. तसेच वाशिम जिल्ह्यात कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांना जिल्ह्याच्या बाहेर जावू देवू नये. ज्यांच्याकडे पोलीस विभागाची परवानगी असेल अशाच अधिकारी, कर्मचारी यांना जिल्ह्याबाहेर जाण्यास किंवा जिल्ह्यात येण्यास परवानगी द्यावी. तसेच चेकपोस्टवर तपासणीअंती जिल्ह्याबाहेरून ये-जा करीत असल्याचे आढळून आलेल्या अधिकारी, कर्मचारी यांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास द्यावी, असे पोलीस प्रशासनाला कळविण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.