Header Ads

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना


कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना

दिव्यांग व्यक्तींकरीता जिल्हा परिषदेची 19 लाखावर तरतुद

लाभार्थ्यांनी पंचायत समितीस्तरावर अर्ज करावे : चंद्रकांत ठाकरे


     वाशिम दि25 - कोरोना विषाणूचाप्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाभर लॉकडाऊन सह संचारबंदी लागु करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत दिव्यांग व्यक्तींकरीता जिवनावश्यक वस्तु करीता जिल्हा परिषदेने 19 लाख 20 हजार रुपायाची  तरतुद केली असुन पात्र लाभार्थ्यांनी पंचायत समितीस्तरावर अर्ज करण्याचे आवाहन जि.प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी केले आहे.  
     ग्रामिण भागात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषद मार्फत विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. यासाठी जि. प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, उपाध्यक्ष डॉ. शाम गाभणे, सर्व सभापती आणि जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी  हे परिश्रम घेत आहेत. नुकताच जिल्हा परिषदेच्या शेष फंडातुन कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रु. 26 लाखाची तरतुद करण्यात आली आहे. प्रति सर्कल 50 हजार याप्रमाणे 52 सर्कल करीता एकुण रु. 26 लाख रुपयाचा निधी वितरीत करण्यात आला आणि आता दिव्यांग व्यक्तींना जिवनावश्यक वस्तुकरीता रु. 19.20 लाखाच्या निधीचे वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच बरोबर ग्राम पंचायतींनी 5 टक्के निधी दिव्यांग व्यक्तींना जिवनावश्यक वस्तुकरीता खर्च करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या वतीने देण्यात आले आहेत.
      जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कल्याण निधी मध्ये शिल्लक असलेला रु. 19.20 लाख निधी दिव्यांग व्यक्तींना 50 टक्के वैयक्तिक व 50 टक्के सामु‍िहक पातळीवर वितरीत करण्यात येणार आहे. याकरीता लाभार्थींनी तालुका स्तरावर अर्ज करण्याचे आवाहन जि.प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, उपाध्यक्ष डॉ. शाम गाभणे आणि समाज कल्याण सभापती वनिता सिध्दार्थ देवरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
आशा-अंगणवाडी सेविका व ग्रा.प. कर्मचारी यांना 34 लाख प्रोत्साहन भत्ता वितरीत:
     ग्राम स्तरावर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत ग्राम पंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनिस, आशा वर्कर आणि केंद्रचालक अशा एकुण  3489 कर्मचाऱ्यांना प्रत्‍येकी रु 1000 प्रमाणे जि. प.च्या वतीने रु 34 लाख 68 हजार रु. प्रोत्साहन भत्ता वितरीत करण्यात आला आहे. 

तालुका निहाय प्रोत्साहन भत्ता वितरण:
तालुका
वितरीत निधी  रु.
वाशिम
405000
रिसोड
572000
मालेगाव
605000
मंगरुळपीर
679000
मानोरा
614000
कारंजा
593000
एकुण रु.
3468000


No comments

Powered by Blogger.