Header Ads

उपविभागीय अधिकारी, तहसीलदार इन्सिडेंट कमांडर म्हणून घोषित


उपविभागीय अधिकारी, तहसीलदार इन्सिडेंट कमांडर म्हणून घोषित


·  संचारबंदी आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करणार


· अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी


वाशिम, दि. २७ : संचारबंदी काळात अत्यावशक सेवा सुरळीतपणे सुरु ठेवणे, तसेच संचारबंदी आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना त्यांच्या कार्यक्षेत्राचे इन्सिडेंट कमांडर म्हणून घोषित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी निर्गमित केले आहेत.
‘कोरोना’ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ मधील तरतुदींची व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ ची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील सर्व सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार संबंधित क्षेत्राचे इन्सिडेंट कमांडर म्हणून काम पाहतील. त्यांना संबंधित कार्यक्षेत्रामध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ ची प्रभावी अंमलबजावणी होते किंवा नाही, हे तपासणे तसेच पोलीस विभाग व इतर कार्यकारी यंत्रणेच्या मदतीने प्रभावी अंमलबजावणी करून घेण्याबाबत अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. संचारबंदी काळात अत्यावश्यक सेवा ह्या सुरळीतपणे सुरु राहतील, आरोग्य यंत्रणेला त्यांची कार्ये पार पडतांना अडचणी येणार नाहीत, याची दक्षता घेणे व त्याचे नियंत्रण करण्याची जबाबदारी सर्व इन्सिडेंट कमांडरवर राहणार आहे.
आवश्यक सेवा पुरविणाऱ्या सेवा पुरवठादारांची वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांना व त्यांच्या कर्मचाऱ्यांरी यांच्या वाहनांना अत्यावश्यक सेवांचे स्टीकर लावणे आवश्यक असून असे स्टीकर लावलेली वाहने अत्यावशक सेवांसाठीच वापरली जात असल्याची खात्री करून पोलीस त्यांना कलम १४४ मधून सूट देवू शकतात. मात्र विनाकारण कोठेही गर्दी होणार नाही व अनावश्यक वाहने व व्यक्ती घराबाहेर पडणार नाही, याची पोलीस यंत्रणेने दक्षता घेणे आवश्यक आहे. तसेच अत्यावश्यक सेवा सुरु असतांना कोठेही गर्दी होणार नाही, लोक एकत्र येवून संचारबंदीचे नियम मोडणार नाहीत, याची खबरदारी इन्सिडेंट कमांडर यांनी घ्यावी, असे आदेश जिल्हादंडाधिकारी यांनी दिले आहेत.
*****

No comments

Powered by Blogger.