Header Ads

युवकाची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या


युवकाची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या 

सास ने जलपटू विजय भिसे यांनी काढले मृतदेह बाहेर 

कारंजा (श.प्र.) दि.२७ - स्थानीक शिवाजी नगर परिेसरातील विहीरीत एका यूवकाचे मृतदेह कारंजा येथे मनोभावाने सेवा देणार्‍या सास च्या चमुने प्रशासनाचे मदतीने व संमतीने बाहेर काढले. सदरहू युवकाचे नांव दिलीप माणिकराव इंगळे (वय २८ वर्ष) असे असून तो इंदिरा नगर येथील रहिवासी आहे. 
याबाबत हकीकत अशी की, येथील सामाजीक कार्यकर्ते गणेश बाबरे यांनी सर्वधर्म आपातकालीन संस्था सासचे प्रमुख शाम सवाई यांना आपले घराजवळील विहीरीत युवक पहुडलेला असल्याची माहिती दिली. यावेळी शाम सवाई यांनी घटनास्थळ गाठून तहसिलदार धिरज मांजरे, ठाणेदार सतिश पाटील यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर सासचे जलपटू विजय भिसे, कासिम रवि घाटे यांचे मदतीने युवकाचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. 
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पाटील यांनीही घटनास्थळी भेट दिली. 

कोरोनाच्या भयग्रस्त वातावरणातही सास चे समाजकार्य सुरुच 

संपूर्ण भारतासह जगात कोरोनाचे भयग्रस्त वातावरण असून लोक एकमेकांपासून दुरी ठेवून चालत व बोलत आहेत. अशा परिस्थितीतही ज्याप्रमाणे वैद्यकीय विभाग, पोलिस विभाग, स्वच्छता विभाग, पुरवठा विभाग, मिडीया हे जिवावर उदार होऊन समाजकार्य करीत आहेत तसेच सर्वधर्म आपातकालीन संघटना म्हणजेच सास चे कार्य हे अविरत सुरु आहे. 

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.