Header Ads

बुलडाणा जिल्ह्यातील ‘त्या’ रुग्णाचा वाशिम येथील नातेवाईक विलगीकरण कक्षात


बुलडाणा जिल्ह्यातील ‘त्या’ रुग्णाचा
वाशिम येथील नातेवाईक विलगीकरण कक्षात

·       ‘कोरोना’ संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय
·        इतर नातेवाईकांनीही स्वतःहून तपासणी करण्याचे आवाहन

वाशिम (जनता परिषद) दि. ३० : बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णाचा २८ मार्च रोजी मृत्यू झाला. या रुग्णाला आजारी असतांना तीन-चार दिवसापूर्वी  वाशिम येथील काही नातेवाईक भेटण्यासाठी गेले होते. तसेच सदर रुग्णाच्या अंत्यविधीला सुध्दा काही नातेवाईक उपस्थित असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून वाशिम येथील गंगू प्लॉट, बागवान पुरा, आरिफ नगर येथील डॉ. जिब्राल हॉस्पिटल परिसरातील एका नातेवाईकाला जिल्हा सामान्य रुग्णालय येथील विलगीकरण (क्वारंटाईन) कक्षात आरोग्य विभागाच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.

वाशिम जिल्ह्यात अद्यापपर्यंत ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळलेला नाही. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी सुद्धा प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत व्यक्तीला आजारी असतांना भेटण्यासाठी गेलेल्या अथवा त्याच्या अंत्यविधीला उपस्थित राहिलेल्या वाशिम शहरातील व जिल्ह्यातील इतर नातेवाइकांनी सुद्धा स्वतःहून जिल्हा सामान्य रुग्णालयात संपर्क साधून आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी. त्यांची योग्य काळजी घेतली जाईल. तसेच या नातेवाईकांबाबत माहिती असल्यास नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला कळवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.