Header Ads

आता तालुकास्तरावरही मिळणार शिवभोजन


आता तालुकास्तरावरही मिळणार शिवभोजन


वाशिम, दि. ३० : गरीब व गरजू व्यक्तींना स्वस्त दरात भोजन मिळावे, यासाठी सुरु करण्यात आलेल्या शिवभोजन योजनेची २६ जानेवारी पासून वाशिम येथे जिल्हास्तरावर अंमलबजावणी सुरु आहे. या योजनेचा पुढचा टप्पा म्हणून १ एप्रिल पासून शिवभोजन योजना आता उर्वरित ५ तालुक्याच्या ठिकाणी सुध्दा सुरु होणार आहे. याकरिता जिल्ह्याला ९०० थाळीचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.

तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समिती तालुकास्तरावर शिवभोजनालये सुरु करण्याची कार्यवाही करणार आहे. रिसोड, कारंजा व मंगरूळपीर येथे प्रत्येकी २०० थाळी, तर मालेगाव आणि मानोरा येथे प्रत्येकी १५० थाळीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. तालुकास्तरीय समितीने निश्चित केलेल्या शिवभोजनालयात सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंतच्या कालावधीत गरीब व गरजू व्यक्तींना शिवभोजनाचा लाभ घेता येईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव यांनी कळविले आहे.

No comments

Powered by Blogger.