Header Ads

शिवसेनेचा पुढाकार खासदार भावनाताई गवळी यांच्याकडून किराणा वाटप



गरीब २ हजार कुटुंबांना मदत!

शिवसेनेचा पुढाकार खासदार भावनाताई गवळी यांच्याकडून 

किराणा वाटप स्तलांतरीत लोकांना जेवन  


             वाशीम (जनता परिषद ) दि.30  : जिल्हा लॉकडाऊन असल्याने अनेक मजुरांचे स्तलांतर होत आहे. शिवाय रोजगार नसल्याने अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ येत आहे. यासाठी भावनाताई गवळी यांनी खासदार निधीतून भरघोष मदत केली असून जिल्ह्यातील दोन हजार कुटुंबांना किरणा वाटप केला आहे. तर स्तलांतरीत लोकांची जेवनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी जिल्ह्यातील शिवसैनिक खासदार भावनाताई गवळी यांच्या नेतृत्वात भुकेल्यांचे पोट भरण्यासाठी मेहनत घेत आहेत. 
          जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून पुढील आदेशापर्यंत कोणत्याही व्यक्तीला जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे जिल्ह्यातील जे नागरिक इतर जिल्ह्यात आहेत, त्यांना तिथेच राहण्याची सूचना नातेवाईकांनी करावी. बाहेर जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था नागरिकांची जेवनाच्या पॉकीटची व्यवस्था जिल्हा प्रमुख सुरेश मापारी करीत आहेत. शिवाय जिल्हा प्रमुख सुरेश मापारी यांनी बंदोबस्त पोलिसांनाही  पुरी भाजीचे जेवन देण्याची व्यवस्था केली आहे. गरजुंना मदत मिळावी म्हणून खासदार भावनाताई गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रमुख सुरेश मापारी जि.प. सभापती विजय खानझोडे, तालुका प्रमुख रामदास मते, शहर प्रमुख गजानन भांदुर्गे, नागोरावजी ठेंगळे, नामदेव हजारे, खंडारे गुरुजी, निलेश पेंढारकर, अशोक शिराळ, संतोष काळे, विशाल खंडेलवाल, जनशिक्षणचे सोयब निजामी हे गरजूंना मदत करीत आहेत. 
              जिल्ह्यातील जे नागरिक इतर जिल्ह्यांमध्ये अडकले आहेत, त्यांना तिथेच जीवनावश्यक सुविधा पुरविण्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनाला कळविले जाईल. मात्र कोणत्याही यापुढे जिल्ह्यात कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्तीला जिल्ह्याबाहेर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. आपल्या जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यातील, बाहेरील जिल्ह्यातील मजुरांना, नागरिकांना जिल्हा प्रशासन जीवनावश्यक वस्तू पुरविणार आहे. 
            प्रशासनाच्या अगोदर शिवसैनिक गरजूपर्यंत पोहोचून मदत करीत असल्याने गरीबांच्या चेहर्‍यावर आनंद दिसून आला. 

No comments

Powered by Blogger.