Header Ads

श्री गुरुमंदीर संस्थान अन्नदानाद्वारे गरजूंसाठी सरसावले


श्री गुरुमंदीर संस्थान अन्नदानाद्वारे गरजूंसाठी सरसावले 

गोर-गरीब, गरजूं व रुग्णांना फुड पॅकेटचे वाटप 

कारंजा (श.प्र.) दि.२७ - कोरोनाच्या ह्या बंदीमध्ये सामाजिक बांधीलकीची जपवणूक करीत स्थानीक गुरुमंदीर संस्थानने गोर गरीब गरजूंसह खाजगी तसेच सामान्य रुग्णालयात असणार्‍या रुग्णांना फुड पॅकेटचे वाटप करण्यात आले. तसेच पिण्यासाठी पाणी ही गाडीमध्ये ठेवण्यात आले असून पिण्याचे पाण्याचेही वाटप करण्यात येत आहे. 
आज रेल्वे स्टेशन परिसरातील झोपडपट्टीमध्ये राहणार्‍या गोर गरीबांना तसेच विविध दवाखान्यातील बाहेर गावाहुन आलेल्या रुग्ण व त्यांचे नातेवाईकांना तसेच शहरातील इतर भागातील गोर गरीब नागरिकांमध्ये फुड पॅकेटचे वाटप करण्यात आले. 
कारंजाचे ग्राम दैवत असणार्‍या गुरुमंदीरचे व्यवस्थापनाने गरजूंसाठी भाजी व पोळीचे वाटप ह्या बाबत कारंजाचे ठाणेदार सतीश पाटील यांना विनंती करून यासाठी मान्यता मिळविली. मंदीराचे या कार्यासाठी समाजसेवक संतोष ढोंगडे तसेच रोहित महाजन हे गरजूंपर्यंत अन्नाचे वाटप करीत आहेत.
संपूर्ण संचारबंदी काळात गोरगरीबांसाठीचे हे कार्य सुरु राहणार असल्याची माहिती संतोष धोंगडे यांनी दिली आहे. 
कोणत्याही नागरिकाला अन्नावाचून कोणी दिसून आला असेल तर खालील क्रमांक ७०३८०७४३९९ - प्रसन्ना पळसकर (नगरसेवक),  ९८५०३८९८११ - रोहित देशमुख,  ९६७३३५०६०१ - संतोष ढोंगडे यांचे दुरध्वनीवर माहिती द्यावी. 

No comments

Powered by Blogger.