Header Ads

जिल्हा पोलिस अधिक्षक वसंत परदेशी यांचे वाशिम जिल्हा पोलिस दलाला निर्देश


जिल्हा पोलिस अधिक्षक वसंत परदेशी यांचे वाशिम जिल्हा पोलिस दलाला निर्देश 

वाशिम (आशिष शर्मा) दि.२७ - दि.कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू केल्यामुळे या काळात कोण-कोणत्या सेवा सुरु राहणार आहेत त्या बद्दल बंदोबस्तावर असणार्‍या कर्मचार्‍यांकरीता वाशिम जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक मा.श्री. वसंतजी परदेशी यांनी मार्गदर्शक सुचना जाहीर केल्या आहेत. 
         यामध्ये नेमक्या कोणत्या अत्यावश्यक वस्तू आहेत तसेच अत्यावश्यक सूविधा यांचे बाबत पुर्णपणे विस्तूत चर्चा केली असून कोणत्या व्यक्तींना रस्त्यावर येण्यापासून अडवावे व घरी पाठवावे याबाबत मार्गदर्शन केले आहे. 
अत्यावश्यक वस्तू :-
१) किराणा माल २) भाजीपाला-फळे ३) दुध-अंडी ४) औषधे ५) मटन/चिकन शॉप ६) हॉस्पीटल/क्लिनीक
वरील सेवा पुरविणारी दुकाने सुरु राहतील. यांच्या वाहतुकीच्या रिकाम्या किंवा भरलेल्या गाड्या, दुकान माल,. दुकानात काम करणारे कामगार व मदतनीस यांना अडवू नये. या व्यक्तींना सोडविण्यासाठी किंवा घेण्यासाठी येणार्‍या लोकांना त्रास देवू नये.

अत्यावश्यक सुविधा :- 

१. वैद्यकीय सेवा - सरकारी किंवा खाजगी डॉक्टर, नर्स, सिस्टर यांना कोठेही अडवू नये. काही नर्स, सिस्टर यांना स्वत: गाडी चालविता येत नसल्याने त्यांचे नातेवाईक त्यांना सोडविण्यासाठी येऊ शकतात. त्यांना त्रास होवू देवू नये.
२. सफाई कर्मचारी - सर्व प्रकारचे हॉस्पिटल्स, कार्यालय., नगरपालिका, जिल्हा परिषद व इतर
३) बँक कर्मचारी - सर्व बँका, पतपेढ्या इत्यादी
४) सुरक्षा कर्मचारी - खाजगी व व सरकारी दोन्ही (सिक्यूरिटी गार्ड)
५) वीजवितरणाशी संबंधीत
६) पाटबंधारे विभाग, पाणीपुरवठा विभाग
७) साखर कारखान्यावर काम करणारे कर्मचारी, मालक, सुपरवाइजर, इत्यादी
८) शेतमालक, शेतमजूर, शेती कामाशी संबंधीत व्यवसाय
९) पत्रकार, त्यांचे फोटोग्राफर
१०) अ. औषधे बनविणार्‍या कंपन्या
     ब. खाद्य प्रदार्थ बनविणार्‍या कंपन्या
     क. स्वच्छतेसाठी आवश्यक गोष्टी बनविणार्‍या कंपन्या
     ड. सुरक्षा विभागासाठी आवश्यक गोष्टी बनविणार्‍या कंपन्या
या सर्व ठिकाणी काम करणारे लोक, मॅनेजर, कामगार, कच्चा माल पूरविणारे, सुरक्षा रक्षक यांना अडवू नये.
११. बंद करण्यात आलेल्या इतर कंपन्यांच्या सुरक्षेसाठी नियूक्त करण्यात आलेले सुरक्षा रक्षक यांना अडवू नये.
१२) ऑनलाईन खाद्यप्रदार्थ पुरविणारे व्यवसायीक यांचे कामगार
१३) हायवे रोडवरुन औद्योगीक व किरकोळ मालाची ने आण करण्या करीताचे ट्रक
१४) इंटरनेट सुविधांशी संबंधीत कर्मचारी  १५) केबल ऑपरेटर्स  १६) टेलिफोन संबंधीत कर्मचारी
१७) अत्यावश्यक वस्तूंची होम डिलीव्हरी
१८) तात्काळ वैद्यकीय सेवेसाठी जाणारे लोक व त्यांचे वाहन - गर्भवती महिला, डायलेसीस पेशंट, सिरीयस पेशंटस्, ऑपरेशनसाठी न्यावयाचे पेशंटस
१९) सर्व रुग्णवाहीका व शववाहीका
२०) सर्व अत्यावश्यक व इतर सर्व मालांची मालवाहतूक करणारी जड वाहणे (त्यामध्ये कोण्याही प्रकारची प्रवासी वाहतूक होता कामा नये)
२१) सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सुचना की प्रत्येक अत्यावश्यक सेवेच्या ठिकाणी ५ फुटाचे अंतराचे चौकन तयार करण्यात यावेत.
सर्व अत्यावश्यक सेवा २४ तास चालु राहतील.

कोणाला अडवावे व घरी पाठवावे 

१. अनावश्यक फिरणारे सर्व २) गर्दी करणारे ३) Social Distancing न पाळणारे
४. सकाळ व संध्याकाळ फिरायला जाणारे (Morning Walk / Evening Walk )
५) कुत्र्यांना फिरायला येवून बाहेर फिरणारे ६) जेष्ठ नागरिक ७) लहान मुले 
८) Without Emergency - Two Wheeler, Four Wheeler घेवून वाहतूक करणारे 
* वरील सर्वांना घरी परत जाण्यासाठी पब्लिक अनाऊंन्सिंग P.A.System च्या माध्यमातून संयमाने आवाहन करावे व परता पाठवावे. 
  * विनकारण असभ्य भाष्य / बल प्रयोग नको 
* न ऐकणार्‍यावर कायदेशीर कारवाई करावी, बेशिस्त बळाचा प्रयोग नको. 
* वरील सुचनांचे उल्लंघन करणार्‍या कर्मचार्‍यावर कारवाई करणे आवश्यक होईल तरी सुचनांचे तंतोतंत पालन करावे. 

चला लढूया कोरोनाशी साथ आहें पोलीसाची 

No comments

Powered by Blogger.