Header Ads

शेतकऱ्यांनी नाफेडच्या ई-समृद्धी ॲपवर नोंदणी करून किमान आधारभूत योजनेचा लाभ घ्यावा - register on NAFED's e-Samriddhi app and avail the benefits of the Minimum Basic Income Scheme

शेतकऱ्यांनी नाफेडच्या ई-समृद्धी ॲपवर नोंदणी करून किमान आधारभूत योजनेचा लाभ घ्यावा - register on NAFED's e-Samriddhi app and avail the benefits of the Minimum Basic Income Scheme


शेतकऱ्यांनी नाफेडच्या ई-समृद्धी ॲपवर नोंदणी करून किमान आधारभूत योजनेचा लाभ घ्यावा  

 जिल्हाधिकारी कुंभेजकर यांचे आवाहन 

वाशिम, दि. ४ नोव्हेंबर (जिमाका / www.jantaparishad.com) - महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई व नाफेड कार्यालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने हंगाम २०२५-२६ मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभूत किंमतीनुसार मुग, उडिद व सोयाबीन खरेदी प्रक्रियेस १५ नोव्हेंबर २०२५ सुरुवात होणार आहे. 

केंद्र शासनाने निश्चित केलेले आधारभूत दर पुढीलप्रमाणे आहेत:

  • मुग – ८ हजार ७६८ प्रति क्विंटल,
  • उडिद – ७ हजार ८०० प्रति क्विंटल,
  • सोयाबीन – ५ हजार ३२८ प्रति क्विंटल

सद्यस्थितीत वाशिम जिल्ह्यात राज्य पणन महासंघाचे ३ व विदर्भ पणन महासंघाचे ४ केंद्रांवर शेतकरी नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे यांच्या माध्यमातून ८ शेतकरी उत्पादक कंपनींचे प्रस्ताव नाफेडकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत.

ही योजना शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा या उद्देशाने राबविण्यात येत असून सर्व शेतकऱ्यांनी नाफेडच्या नजीकच्या खरेदी केंद्रावर जाऊन ७/१२ उतारा, आधारकार्ड व बँक पासबुकसह नोंदणी करणे आवश्यक आहे.

नोंदणी प्रक्रिया पीओएस मशीनद्वारे ऑनलाईन पद्धतीने केली जाणार असून नोंदणीसाठी प्रत्यक्ष उपस्थिती अनिवार्य आहे.

गर्दी टाळण्यासाठी नाफेडने विकसित केलेल्या “ई-समृद्धी” मोबाइल ॲप च्या माध्यमातूनही शेतकरी घरबसल्या नोंदणी करू शकतात. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून मोबाईलद्वारे सोप्या पद्धतीने नोंदणी करता येईल.

शेतकऱ्यांनी ई-समृद्धी ॲपद्वारे स्व-नोंदणी करून केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा.असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.