Header Ads

पात्र शेतकऱ्यांनी ‘जन समर्थ’चा लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस jan samarth web portal - eligible farmers should take advantage

पात्र शेतकऱ्यांनी ‘जन समर्थ’चा लाभ घ्यावा  - जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस jan samarth web portal - eligible farmers should take advantage


पात्र शेतकऱ्यांनी ‘जन समर्थ’चा लाभ घ्यावा  - जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस 

शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड पीक कर्ज मंजुरीसाठी विशेष मोहीम 

जिल्हा समन्वय सल्लागार समितीची विशेष बैठक 

वाशिम,दि.१२ ऑगस्ट (जिमाका / www.jantaparishad.com) - शेतकऱ्यांना पिककर्जाची मंजुरी जलद, पारदर्शक आणि कागदविरहित पद्धतीने मिळावी, यासाठी जन समर्थ पोर्टल (jan samarth web portal) चा वापर सुरू झाला आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ (eligible farmers should take advantage) घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी केले. या उपक्रमामुळे बँकांच्या फेर्‍या टाळून घरबसल्या कर्जमंजुरीची सोय होणार आहे.

शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज मिळावे यासाठी महाराष्ट्र सरकारने कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय (भारत सरकार) आणि पीएसबी अलायन्स यांच्यासोबत सामंजस्य करार केला आहे. या उपक्रमाअंतर्गत अॅग्रीस्टॅक डेटा थेट जन समर्थ पोर्टलशी जोडण्यात आले आहे, ज्यामुळे कर्ज मंजुरीची प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, सुलभ आणि कागदविरहित होणार आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी केले.

    आज १२ ऑगस्ट रोजी जिल्हा समन्वय समितीची विशेष बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी बोलत होत्या.

जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी सांगितले की, जन समर्थ पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जलद, पारदर्शक आणि त्रासमुक्त पद्धतीने पीककर्ज मिळू शकणार आहे. राज्य शासनाने कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय तसेच पीएसबी अलायन्ससोबत केलेला हा उपक्रम ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यास आणि शेतकऱ्यांचा आर्थिक भार हलका करण्यास हातभार लावेल. जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह वरील प्रक्रियेनुसार अर्ज करावा, असेही त्यांनी आवाहन केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, अग्रणी बँक व्यवस्थापक यशवीर कुमार, जिल्हा उपनिबंधक जी.पी. साबळे तसेच विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री.यशवीर यासंदर्भात माहिती देतांना म्हणाले , पात्र शेतकऱ्यांचा आधार क्रमांक मोबाईल क्रमांकाशी जोडलेला असावा.अॅग्रीस्टॅक रजिस्ट्रीमध्ये नोंदणी असावी आणि मान्यता मिळालेली असावी.

सध्या ही सुविधा वैयक्तिकरित्या जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठीच उपलब्ध आहे.

पुढे बोलतांना त्यांनी अर्ज प्रक्रियेची माहिती दिली.

शेती नोंदणी तपासा — आधार क्रमांक किंवा नोंदणी आयडी आवश्यक.www.jansamarth.in वर जा आणि मोबाईल नंबर वापरून केसीसीसाठी अर्ज करा.

कृषी कर्ज - किसान क्रेडिट कार्ड निवडा व पात्रता तपासा.राज्य आणि जिल्हा निवडा. संमती फॉर्म वाचा आणि पुढे जा.आधार क्रमांक प्रविष्ट करून ई-केवायसी पूर्ण करून यानंतर अर्जदाराने बँक खात्याची माहिती,वैयक्तिक माहिती,आर्थिक माहिती,जमीन व इतर तपशील प्रविष्ट करावेत, अर्ज पुनरावलोकन करून बँक निवडावी.

      या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना बँकेत वारंवार फेऱ्या न मारता, घरबसल्या आणि वेळेत पिककर्जाची सुविधा मिळणार आहे. तसेच जिल्ह्यात कृषी विभागाच्या संयुक्त वतीने १६० विशेष केसीसी शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. १४ ऑगस्ट पर्यंत जवळपास १ हजार प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.