Header Ads

'शी बॉक्स' पोर्टलवर अंतर्गत तक्रार समित्यांची नोंदणी आता अनिवार्य - 'She Box' portal - Registration of internal grievance committees on now mandatory

 

'शी बॉक्स' पोर्टलवर अंतर्गत तक्रार समित्यांची नोंदणी आता अनिवार्य -  'She Box' portal - Registration of internal grievance committees on now mandatory

'शी बॉक्स' पोर्टलवर अंतर्गत तक्रार समित्यांची नोंदणी आता अनिवार्य 

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वाशिम यांचे आवाहन

वाशिम,दि.16 मे (जिमाका) कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोश ऍक्ट Act २०१३ मधील कलम ४ अन्वये ज्या कार्यालयामध्ये १० किंवा १० पेक्षा जास्त कर्मचारी असतील अशा सर्व खासगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. तसेच या अंतर्गत तक्रार समितीची नोंदणी शी बॉक्स' पोर्टल (SHE BOX PORTAL) वर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

पोर्टलवर नोंद करण्याची कार्यपद्धती याप्रमाणे —

https://shebox.wcd.gov.in या वेबसाईटवर जाऊन होम स्क्रिनवर दाखविल्याप्रमाणे अंतर्गत तक्रार समिती नोंदवा या टॅबवर Click करुन आवश्यक त्या सर्व माहितीचा तपशील भरुन Submit या टॅब वर Click करुन अंतर्गत तक्रार समितीची माहिती नोंदविता येईल.

सर्व खासगी आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समितीची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वाशिम यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.