Header Ads

वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती - Dattatray Bharane Palakmantri of Washim district

वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती - Dattatray Bharane Palakmantri of Washim district


वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती

वाशिम जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणार - पालकमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. २६  (Source - DGIPR) (www.jantaparishad.com) : वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी क्रीडा व युवक कल्याण मंत्री  दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे (Dattatray Bharane Palakmantri of Washim district). या नव्या जबाबदारीमुळे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

पालकमंत्री पदाची धुरा सांभाळताना वाशिम जिल्ह्याचा सर्वांगीण, समतोल विकास साधणार अशी प्रतिक्रिया मंत्री भरणे यांनी दिली आहे. वाशिम जिल्ह्यात शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी काटेकोर नियोजन करणार. पायाभूत सुविधा भक्कम करण्याबरोबर लोकप्रतिनिधी, शेतकरी, कष्टकरी, उपेक्षित, महिला, वृद्ध, युवक आदी घटकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार. विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे मंत्री भरणे यांनी स्पष्ट केले आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.