Header Ads

सामाजिक न्याय विभागाचा ‘घर घर संविधान’ उपक्रम - Ghar Ghar Sanvidhan

सामाजिक न्याय विभागाचा ‘घर घर संविधान’ उपक्रम - Ghar Ghar Sanvidhan


प्रजासत्ताक दिनी होणार संविधानाचा जागर

सामाजिक न्याय विभागाचा ‘घर घर संविधान’ उपक्रम

Ghar Ghar Sanvidhan

मुंबई, दि. 22 : भारतीय संविधानास 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सन 2024-25 पासून ‘घर घर संविधान’ (Ghar Ghar Sanvidhan) उपक्रम राज्यात राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत  प्रजासत्ताक दिनी संविधानाचा जागर होणार आहे. प्रजासत्ताक दिनी म्हणजेच दि. 26 जानेवारी 2025 रोजी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी भारतीय संविधानाबद्दल माहिती देणारे कार्यक्रम व संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाटप पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय विभागांतर्गत सर्व आस्थापनांमध्ये संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात येणार आहे. 

भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता तसेच संविधानाची मूल्ये शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच नागरिकांपर्यंत पोहोचावीत यासाठी राज्यातील प्राथमिक,माध्यमिक सर्व प्रकारचे व्यावसायिक, बिगर व्यावसायिक महाविद्यालय, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृह, निवासी शाळा, शासन मान्यताप्राप्त अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित शाळा, आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था, महाराष्ट्र विधान परिषद, विधानसभा अशा सर्व ठिकाणी ‘घर घर संविधान’  (Ghar Ghar Sanvidhan) हा उपक्रम राबवण्यात येत आहे. दि. 26 नोव्हेंबर 2024 ( संविधान दिवस) पासून हा उपक्रम राबविण्यात येत  आहे. या उपक्रमांतर्गत विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धांचे, व्याख्यान, रॅली व संविधान जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन  राज्यभरात करण्यात आले  आहे, अशी माहिती सामाजिक न्याय विभागाने दिली आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.