राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कायदेशीर कारवाई करा ! - Take legal action to prevent desecration of the national flag!
राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कायदेशीर कारवाई करा !
हिंदु जनजागृती समितीने तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर !
'हिंदु जनजागृती समितीची 'राष्ट्राध्वजाचा सन्मान राखा' मोहिमेचे 21वे वर्ष'
कारंजा (लाड) दि १३ - राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी हे राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने फडकवले जातात, मात्र हेच राष्ट्रध्वज त्याच दिवशी कचरापेटीत, गटारात अन फाटलेल्या अवस्थेत आढळतात, प्लास्टिकचे ध्वज लगेच नष्ट न झाल्याने या राष्ट्रध्वजांची विटंबना अनेक दिवस पहावी लागते, राष्ट्र ध्वजाची ही विटंबना रोखावी, आणि शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिक ध्वज विक्रेत्यांवर कार्यवाई करावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने तहसीलदार श्री कुणाल झाल्टे आणि पोलीस निरीक्षक श्री दिनेशचंद्र शुक्ला यांना दिनांक १२ ऑगस्ट रोजी देण्यात आले.
राष्ट्रध्वजाचा योग्य तो सन्मान विद्यार्थ्यांकडून राखल्या जावा, आणि मुलांमध्ये या विषयी जनजागृती व्हावी, यासाठी समितीच्या वतीने प्राथमिक, माध्यमिक आणि हायस्कूल शाळा यांना सुद्धा निवेदन देण्यात आली आहेत.
निवेदन देतांना श्री संत गाडगेबाबा पतसंस्था कारंजा चे अध्यक्ष व परिट (धोबी) समाजाचे ज्येष्ठ नेते श्री विश्वनाथ राऊत, महाराष्ट्र परीट (धोबी) समाजाचे विदर्भ विभागीय अध्यक्ष श्री रमेश सांबसकर, विश्व हिंदू परिषद चे जिल्हा उपाध्यक्ष श्री मंगेशजी कडेल, बजरंग दलचे प्रखंड संयोजक रितेश चौकशे, श्रेयस लाहे, निखिल चौकशे, अभि रंगे, अनिकेत डाखोरे. हिंदू जनजागृती समितीचे श्री हेमंत फुलाडीसर, श्री मनोज फुलारी, श्री प्रकाश सुपलकर, सागर गाडगे, सचिन काळे, प्रदीप धाये , मयूर लळे उपस्थित होते.
Post a Comment