युवा नेते ॲड. ज्ञायक पाटणी यांच्या हस्ते शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न : Gyayak Patni : Bhoomipujan of various development works in the city by
युवा नेते ॲड. ज्ञायक पाटणी यांच्या हस्ते शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न
कारंजा दि. १२ (www.jantaparishad.com) - दिनांक ११/०८/२०२४ रोजी युवा नेते ज्ञायक पाटणी यांच्या शुभ हस्ते कारंजा शहारातील श्रद्धेय दिवंगत आमदार मा. श्री राजेंद्र पाटणी साहेब यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या अंदाजित किंमत 15 कोटी रुपये कामांपैकी काही खाली दर्शविलेल्या कामांचे भूमिपूजन संपन्न झाले. (Bhoomipujan of various development works in the city completed by by youth leader Adv. Gyayak Patni)
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भाजपा कारंजा शहराध्यक्ष ललित चांडक होते तर प्रमुख अतिथी भाजपा जिल्हा अध्यक्ष शामभाऊ बढे होते.यावेळी कार्यक्रमात सर्वश्री माननीय श्री ललित चांडक भाजपा जिल्हा अध्यक्ष माननीय श्री श्याम भाऊ बडे, प्रा.सुनील काळे, अनिल कानकिरड, श्रीकृष्ण मुंदे,राजीव भेंडे, संकेत नाखले,शहर सरचिटणीस शशी वेळुकर,शहर सरचिटणीस सविज जगताप,अमोल गढवाले , दिनेश वाडेकर, धाने मंगेश, सुरेश गिरमकार,आनंद इन्नाणी,अजय जाधव, ज्ञानेश्वर काळे, अतुल धाकतोड,हर्षल काटोले , संकेत देशमुख , संकेत पारवे, राजेश भागवत, सफल आगे, गजानन जाधव, सौ.मिनाताई काळे, सौ.सौ. मेघाताई बांडे, सौ पिंकीताई शुक्ला, इत्यादी भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांसह अन्य भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
विवीध ठिकाणच्या भूमिपूजन स्थळी त्या त्या स्थळांचे प्रतिष्ठीत नागरिक, रहिवासी मोठया प्रमाणात कार्यक्रम स्थळी उपस्थित होते. विविध कॉलनीतील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. सर्व भूमी पुजन स्थळी सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
- कारंजा येथील तुषार कॉलनीतील दारव्हा रोड ते इंगळे घर ते धोटे घर आणि आडे घर ते तिडके, जाधव घर ते गजानन महाराज मंदिरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण व नाली बांधकाम करणे अंदाजितकिंमत १५६.०२लक्ष,
- कारंजा येथील तुषार कॉलनीतील जगताप घर ते सदर घर ते इंगळे घर आणि येळणे घर ते गहुले घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण व नाली बांधकाम करणे अंदाजित किंमत ५८.५३लक्ष ,
- कारंजा येथील पारेख नगर येथील ठोंबरे यांच्या घरापासून संजय भेंडे यांच्या घरापासून राहुल इंगळे यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण व नाली बांधकाम करणेअंदाजित किंमत ३५.००लक्ष ,
- कारंजा येथील गुरुदेव नगर मंगरुळ रोड ते दिनकर वानखडे यांच्या घरा पर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे व नाली बांधकाम करणे अंदाजित किंमत ५४.३७ लक्ष ,
- गुरुदेव नगर येथील विनायक पद्मगिरवार ते संकेत भदे यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे अंदाजित किंमत ३१.०१ लक्ष,
- गुरुदेव नगर येथील आखरे ते बकाल यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण अंदाजित किंमत ३७.४५ लक्ष,
- मंगरुळपीर रोडवरील गांधी नगर येथील देशमुख सर ते शिंदे सर यांच्या घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करणे अंदाजित किंमत ४७.१६ लक्ष,
- महाराष्ट्र खानावळ ते कऱ्हे नगर येथील अविनाश सावके यांच्या घरापर्यंतच्या रस्त्यावर डांबरीकरण व नाल्यांचे बांधकाम करणे अंदाजित किंमत ७८.०० लक्ष,
- कारंजा येथील नवजीवन कॉलनीतील विजय राठोड घर ते ढाकणे घर ते आनंद नगर या रस्त्याचे काँक्रिटीकरण व नाली बांधकाम करणेअंदाजित किंमत १७९.६५ लक्ष,
- बालाजी नगर-१ येथील पारकेन घर ते महादेव मंदिर ते मनोज राठोड यांच्या घरापर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण व नाली बांधकाम करणे अंदाजित किंमत ३३.२१ लक्ष रूपये इत्यादि कामांचे भूमिपूजन संपन्न झाले.
यावेळी विकास कामांच्या नाम फलकाचे अनावरण मान्यवरांचा हस्ते करण्यात आले.असे संजय भेंडे भाजपा तालुका प्रसिध्दी प्रमुख यांनी कळविले.
Post a Comment