Lokshahi Din on 1st July : १ जुलै रोजी लोकशाही दिन
१ जुलै रोजी लोकशाही दिन
वाशिम,दि.28 जुन (www.jantaparishad.com / जिमाका) - दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. जुलै महिन्यातील लोकशाही दिन १ जुलै २०२४ रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. नागरीकांनी जिल्हास्तरीय लोकशाही दिनातील तक्रार अर्ज जिल्हा/तालुका लोकशाही दिनामध्ये सादर केल्यानंतर विहीत नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह लोकशाही दिनामध्ये १५ दिवस आधी दोन प्रतीत पाठविणे आवश्यक आहे. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी केले आहे.
Post a Comment