Header Ads

Annabhau-Sathe-Vikas-Mahamandal-Yojana : अन्नाभाऊ साठे विकास महामंडळ : योजनेच्या लाभासाठी अर्ज मागविले

Annabhau Sathe Vikas Mahamandal Yojana अन्नाभाऊ साठे विकास महामंडळ : योजनेच्या लाभासाठी अर्ज मागविले


Annabhau Sathe Vikas Mahamandal Yojana

अन्नाभाऊ साठे विकास महामंडळ : योजनेच्या लाभासाठी अर्ज मागविले

वाशिम, दि.28 जून (www.jantaparishad.com / जिमाका) : जिल्हयातील मातंग समाजाच्या युवकांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याकरीता व समाजातील लोकांचे जीवनमान उंचावण्याकरीता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (Annabhau-Sathe-Vikas-Mahamandal-Yojana) कार्यरत आहे. या महामंडळाअंतर्गत मातंग समाजातील १२ पोटजातीतील लोकांना अर्थिक सहाय्य दिले जाते. चालु आर्थिक वर्षात बीजभांडवल योजनेअंतर्गत ५० हजार रुपये ते ७० हजार रुपयापर्यंत जिल्हयातील २५ कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यामध्ये महामंडळाचा सहभाग अनुदानासह ४५ टक्के व लाभार्थी सहभाग ५ टक्के तसेच बँकेचा कर्जाचा सहभाग ५० टक्के आहे. महामंडळाच्या बीज भांडवल रक्कमेवर ४ टक्के व्याजदर आकारण्यात येतो व बँकेच्या कर्ज रक्कमेवर बँकेचा व्याजदर असतो.

अनुदान योजनेअंतर्गत ५० हजार रुपयापर्यंतचे कर्ज प्रस्ताव बँकेला पाठविण्यात येते. त्यामध्ये महामंडळाचे अनुदान १० हजार रुपये असून उर्वरित कर्ज बँकेचे असते. या योजनेचे ४० कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट जिल्हयाला प्राप्त झाले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा मातंग समाज व त्यातील १२ पोटजातीपैकी असावा. वयोमर्यादा १८ ते ५० वर्ष असावी, कर्ज प्रकरणासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट साईजचा फोटो, रेशनकार्ड, आधारकार्ड, मतदान कार्ड, घर टॅक्स पावती, कोटेशन, ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा आहे त्या जागेचा पुरावा, प्रकल्प अहवाल आदी कागदपत्रांसह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, वाशिम येथे कार्यालयीन वेळेत कर्ज प्रस्ताव सादर करावे. असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक जे. एम. गाभणे यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.