Header Ads

लोकसभा निवडणूक २०२४ : यवतमाळ वाशिम मतदारसंघात ६२.८७ टक्के मतदान - Voting in Yavatmal Washim Constituency 2024 : 62.87 percent

लोकसभा निवडणूक २०२४ : यवतमाळ वाशिम मतदारसंघात ६२.८७ टक्के मतदान - Voting in Yavatmal Washim Constituency 2024 : 62.87 percent


लोकसभा निवडणूक २०२४ : यवतमाळ वाशिम मतदारसंघात ६२.८७ टक्के मतदान

 Voting in Yavatmal Washim Constituency 2024 : 62.87 percent

Ø  राळेगाव विधानसंभा मतदारसंघात सर्वाधिक मतदान

Ø  सन 2019 च्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारीत वाढ

यवतमाळ/वाशिम , दि. 27 (जिमाका / www.jantaparishad.com) : यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी काल झालेल्या मतदानात एकून 62.87 टक्के मतदान (Voting in Yavatmal Washim Constituency 2024 : 62.87 percent) झाले. सर्वाधिक 68.96 टक्के मतदान राळेगाव विधानसभा मतदारसंघात झाले आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मतदान टक्केवारीत वाढ झाली आहे.

यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी एकून 19 लाख 40 हजार 916 इतके मतदार होते. त्यात पुरुष 10 लाख 2 हजार 400, महिला 9 लाख 38 हजार 452 तर इतर 64 मतदारांचा समावेश आहे. मतदानाच्या दिवशी सायंकाळी 6 वाजतापर्यंत 12 लाख 20 हजार 189 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यात पुरुष मतदार 6 लाख 55 हजार 658, महिला मतदार 5 लाख 64 हजार 508 तर इतर 23 मतदारांचा समावेश आहे.

सायंकाळी 6 वाजतापर्यंत विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान व टक्केवारी पुढील प्रमाणे आहे. 

  1. वाशिम विधानसभा मतदारसंघ 2 लाख 15 हजार 948 मतदारांनी मतदान केले असून एकून मतदारांच्या ही टक्केवारी 60.56 टक्के इतकी आहे. 
  2. कारंजा मतदारसंघात 1 लाख 87 हजार 42 इतके मतदान झाले, मतदानाची टक्केवारी 60.98 इतकी आहे. 
  3. राळेगाव मतदारसंघ 1 लाख 93 हजार 973 मतदान तर टक्केवारी 68.96 टक्के, 
  4. यवतमाळ मतदारसंघ 2 लाख 12 हजार 484 मतदान तर टक्केवारी 59.46 टक्के, 
  5. दिग्रस मतदारसंघ 2 लाख 20 हजार 6 मतदान, टक्केवारी 66.61 तर 
  6. पुसद विधानसभा मतदारसंघात 1 लाख 90 हजार 736 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून ही टक्केवारी 61.79 टक्के इतकी आहे.

सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात 19 लाख 16 हजार 185 इतके मतदार होते. त्यापैकी 11 लाख 74 हजार 824 मतदारांनी मतदानाचा अधिकारी बजावला होता. मतदानाची ही टक्के 61.31 टक्के इतकी होती. मागील निवडणुकीच्या तुलनेत यानिवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे.

No comments

Powered by Blogger.