Header Ads

वाशिम जिल्ह्यात ५ ते १९ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश prohibition order in Washim district

वाशिम जिल्ह्यात ५ ते १९ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश prohibition order in Washim district


वाशिम जिल्ह्यात ५ ते १९ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

वाशिम, दि. ०२ (www.jantaparishad.com / जिमाका) मालेगाव तालुक्यातील काळामाथा येथे अवलिया महाराज यात्रा भरविण्यात येणार आहे.सद्यस्थितीत मराठा आरक्षण,ओबीसी आरक्षण,राज्य कर्मचारी जुनी पेन्शन लागू करणे व इतर मागण्या संदर्भात विविध मागण्यांचे आंदोलने करण्यात येत आहेत.तसेच विविध पक्ष,संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांचेकडून वेगवेगळ्या मागण्यांकरीता धरणे आंदोलने,उपोषणे करण्यात येत आहेत.

या सर्व बाबींचा विचार करता जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे सोयीचे व्हावे. यासाठी ५ ते १९ फेब्रुवारीपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) चे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी शहाजी पवार यांनी दिले आहे.हे आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी किंवा इतर शासकीय/निमशासकीय अधिकारी- कर्मचारी किंवा विवाह, अंत्ययात्रा तसेच सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूकीस व कार्यक्रमास लागू राहणार नाही.

No comments

Powered by Blogger.