१ हजार दिपकांनी आचार्य विद्यासागरजी महाराज यांना भावपूर्ण विनयांजली - Emotional Tributes to Acharya Vidyasagarji Maharaj
१ हजार दिपकांनी आचार्य विद्यासागरजी महाराज यांना भावपूर्ण विनयांजली
वाशिम येथे सकल सर्वधर्मीय जन समाजाचे आयोजन
वाशिम (www.jantaparishad.com) दि २२ - संत शिरोमणी महामुनीराज आचार्य विद्यासागरजी महाराज यांनी डोंगरगड येथे समतापूर्वक समाधी घेतली आहे. वाशिम येथे सर्वधर्मीय सकल जन समाजाच्यावतीने स्थानिक राजे वाकाटक वाचनालयासमोर क्रांती चौक येथे 111 किलो तुपाचे 11 हजार दिपक प्रज्वलीत करुन भावपूर्ण विनयांजली अर्पण करण्यात आली.
सर्वप्रथम आचार्य विद्यासागरजी महाराज यांच्या प्रतिमासमोर सर्व धर्मीय समाजाचे प्रतिनिधी दिलीप जोशी, माजी आ. पुरुषोत्तम राजगुरु, राहुल तुपसांडे, माहेश्वरी संघटनेचे प्रदेश प्रतिनिधी निलेश सोमाणी, माजी सैनिक रामाभाऊ ठेंगडे, सचिन पेंढारकर, तरणसिंग सेठी, बंटी सेठी, शेख मोबीन, राम धनगर, नितीन अग्रवाल, विनोद गडेकर, श्रेणीक भुरे, बज, प्रकाश बागडे, विकास पाटील, डॉ. अर्चना मेहकरकर, सुशिल भिमजियाणी, मिठूलाल शर्मा, व्यापारी मंडळाचे जिल्हाध्यक्ष जुगलकिशोर कोठारी, मनसे जिल्हाध्यक्ष मनिष डांगे, उबाठा शिवसेना शहर प्रमुख श्याम दुरतकर, भाजपा शहराध्यक्ष संतोष शिंदे, प्रा. प्रशांत गडेकर, आनंद गडेकर, हरिष सारडा, सुनिल तापडीया, संतोष वानखेडे, शिवदूत ऋषीकेश पंचवाटकर, प्रथमेश पंचवाटकर, राजु, अविनाश मारशेटवार, कपील सारडा, संजय नांदगांवकर, प्रविण पाटणी, प्रकाश अग्रवाल, प्रमोद मानेकर, सुनिल गडेकर, सौ. उज्वलाताई उकळकर आदींनी दिपप्रज्वलीत करुन विनयांजली अर्पण केली.
क्रांती चौक ते जुनी नगर परिषद अग्रेसेन चौक महावीर भवनपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दिवे प्रज्वलीत करण्यात आले. यावेळी संपूर्ण रस्त्याची स्वच्छता करण्यात आली. घरासमोर महिलांनी रांगोळी व दिपप्रज्वलीत करुन आचार्यश्री प्रती आपले श्रध्दासुमन अर्पण केले. तद्नंतर गायक शेख मोबीन, मनोज राऊत, प्राचार्य सचिन नकाते, सुनिल बेलोकार, सौ. सुरभी उकळकर, निलेश सोमाणी, सुधाकर कहाते यांनी भक्तीगिताद्वारे आचार्यश्रींना विनयांजली अर्पण केली. यावेळी जेष्ठ पत्रकार विश्वास वाल्ले, दिलीप जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आचार्यश्री हे देहाने जरी नसले तरी विचाराने ते कायम अजरामर असल्याचे सर्वांनी सांगितले.
तद्नंतर हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला, भावीक सर्व धर्मीयांनी दोन मिनीटे मौन पाळून आचार्यश्रींना विनयांजली अर्पण केली. क्रांती चौक ते महावीर भवन, अग्रेसेन चौक पर्यंत उपस्थितांनी पायदळ रॅली काढून तेथेही आचार्यश्री च्या प्रतिमासमोर दिपक प्रज्वलीत करुन विनयांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत गडेकर, संचालन निलेश सोमाणी तर आभार आनंद गडेकर यांनी मानले.
Post a Comment