Header Ads

११ जानेवारीला वाशिम येथे रोजगार मेळावा - Job fair at Washim on 11th January

११ जानेवारीला वाशिम येथे रोजगार मेळावा - Job fair at Washim on 11th January


११ जानेवारीला वाशिम येथे रोजगार मेळावा

जिल्हयातील रोजगार इच्छुक स्त्री/पुरुष उमेदवारांनी लाभ घ्यावा 

Job fair at Washim on 11th January 

वाशिम, दि. ०९ (जिमाका / www.jantaparishad.com) :  कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत नोकरी इच्छुक युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. रोजगार इच्छुक उमेदवारांना विविध क्षेत्रांत निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने जिल्हयात जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता विकास मार्गदर्शन केंद्र व राजस्थान आर्य महाविद्यालय यांच्या वतीने 11 जानेवारी 2024 रोजी राजस्थान आर्य महाविद्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, वाशिम येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन (Job fair at Washim on 11th January) करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यात जिल्हयासह राज्यातील नामांकीत उद्योगाचे उद्योजक/प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखतीद्वारे रोजगार इच्छुक उमेदवारांना रोजगार देण्यासाठी सहभागी होत आहे. रोजगार मेळाव्यात क्रेडीट ॲक्सेस ग्रामीण लि. वाशिम-अकोला, पिपल ट्री व्हेंचर्स प्रा. लि. अमरावती,बि.एस.एस. मायक्रोफायनान्स,वाशिम,धुत ट्रान्समिशन प्रा.लि.छत्रपती संभाजीनगर व एल.आय.सी.इंडीया लि. वाशिम यांच्या कडून किमान इ. 10 वी, इ. 12 वी, आय. टी. आय. (सर्व ट्रेड), पदवीधर (सर्व शाखा) इ. शैक्षणीक पात्रता असणारे 18 ते 45 या वयोगटातील रोजगार इच्छुक स्त्री-पुरुष उमेदवारांची रिक्तपदांवर मुलाखतीद्वारे विविध प्रकारच्या 200 पेक्षा जास्त रिक्तपदावर निवड करण्यात येणार आहे.

तरी जिल्हयातील रोजगार इच्छुक स्त्री/पुरुष उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in आणि www.nic.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने विविध पदासाठी शैक्षणिक पात्रतेनुसार ऑनलाईन पध्दतीने सहभागी होवून 11 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 4 वाजता या कालावधीत राजस्थान आर्य महाविद्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय जवळ, वाशिम येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त विद्या शितोळे यांनी केले आहे. रोजगार इच्छुक उमेदवारांनी स्वखर्चाने त्यांचे 2 पासपोर्ट साईजच्या फोटोसह आधारकार्ड व शैक्षणिक पात्रतेच्या झेरॉक्स प्रतीसह प्रत्यक्षपणे उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र. 07252-231494, भ्रमणध्वनी क्र. 7775814153, 9421706158 व 9764794037 यावर संपर्क साधावा.

No comments

Powered by Blogger.