Header Ads

RTO camp in Washim district - मोटार वाहन तपासणी व परवाना सहामाही तालुकास्तरीय शिबीर

RTO camp in Washim district - मोटार वाहन तपासणी व परवाना सहामाही तालुकास्तरीय शिबीर


मोटार वाहन तपासणी व परवाना सहामाही तालुकास्तरीय शिबीर

वाशिम, दि. 20 (जिमाका / www.jantaparishad.com) :  जिल्हयातील मोटार वाहन चालक/मालक यांच्या सोयीसाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटावर वाहन निरीक्षक यांचा वाहन कर वसुली, मोटार वाहन नोंदणी व तपासणी, वाहन चालक व परवाना (लायसन्स) या कामकाजासाठी शिबिराचे आयोजन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाशिम यांनी केले आहे. जानेवारी 2024 ते जून 2024 या कालावधीत हे सहामाही तालुकास्तरीय शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

         जानेवारी महिन्यात कारंजा येथे 5 व 22 जानेवारी रोजी, रिसोड येथे 9 जानेवारी रोजी, मानोरा येथे 12 जानेवारी रोजी आणि मंगरुळपीर येथे 16 जानेवारी रोजी. फेब्रुवारी महिन्यात कारंजा येथे 5 व 21 फेब्रुवारी रोजी, रिसोड येथे 9 फेब्रुवारी रोजी, मानोरा येथे 13 फेब्रुवारी रोजी आणि मंगरुळपीर येथे 16 फेब्रुवारी रोजी, मार्च महिन्यात कारंजा येथे 5 व 22 मार्च रोजी, रिसोड येथे 11 मार्च रोजी, मानोरा येथे 14 मार्च रोजी व मंगरुळपीर येथे 18 मार्च रोजी, एप्रिल महिन्यात कारंजा येथे 4 व 22 एप्रिल रोजी, रिसोड येथे 8 एप्रिल रोजी, मानोरा येथे 15 एप्रिल रोजी व मंगरुळपीर येथे 18 एप्रिल रोजी, मे महिन्यात कारंजा येथे 3 व 21 मे रोजी, रिसोड येथे 7 मे रोजी, मानोरा येथे 14 मे रोजी व मंगरुळपीर येथे 17 मे रोजी आणि जून महिन्यात कारंजा येथे 4 व 21 जून रोजी, रिसोड येथे 10 जून रोजी, मानोरा येथे 14 जून रोजी व मंगरुळपीर येथे 18 जून रोजी या शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.

 वरील नमुद तारखेला सुट्टी जाहीर झाल्यास शिबीर दौरा दुसऱ्या कार्यालयीन दिवशी घेण्यात येईल. यासाठी अर्ज सकाळी 10 ते दुपारी 1 वाजतापर्यंत स्विकारण्यात येणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी दिली.

No comments

Powered by Blogger.