Header Ads

Change in the route of Washim Hingoli road due to bad railway crossing track

 वाशिम-हिंगोली रोड रेल्वे क्रॉसींगचा ट्रॅक खराब - वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली : Change in the route of Washim Hingoli roadवाशिम-हिंगोली रोड रेल्वे क्रॉसींगचा ट्रॅक खराब

वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली

       वाशिम, दि. 09 (जिमाका/ www.jantaparishad.com) :  वाशिम-हिंगोली रोडवरील रेल्वे क्रॉसींग गेट क्र. 115 वरील रेल्वे ट्रॅकचा काही भाग खराब झाल्यामुळे रेल्वे ट्रॅकवरुन रेल्वे आणि इतर वाहने सुरळीत ये-जा करण्याकरीता त्याची दूरुस्ती करणे आवश्यक असल्याचे रेल्वे विभागाच्या वरीष्ठ सेक्शन इंजिनियर यांनी कळविले आहे. या ट्रॅकवरील वाहतूक 9 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजतापासून ते 11 नोव्हेंबरचे सकाळी 6 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहणार आहे. रेल्वे ट्रॅकची दूरुस्ती ट्रॅफीक सुरु असतांना करणे शक्य नसल्याने वाशिम-हिंगोली रोडवरील वाहतूक पुर्णपणे बंद करुन पर्यायी मार्गावर वळविण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 33 (1)(ख) या अधिकाराने 9 नोव्हेंबर रोजीच्या रात्री 10 वाजतपासून ते 11 नोव्हेंबरच्या सकाळी 6 वाजतापर्यंत पुढीलप्रमाणे वाशिम-हिंगोली मार्गावरील वाहतूक प्रस्तावित मार्गावर वळविण्यात येत आहे.

            मंगरुळपीर, नागपूर, अमरावती आणि पुसदमार्गे वाशिमकडून हिंगोलीकडे जाणारा मार्ग बंद राहणार असल्यामुळे ही वाहतूक अकोला नाका ते अकोला-नांदेड या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 वरील नवीन बायपासवर वळविण्यात येत आहे. अकोला, बाळापूर, पातूर व मालेगांवमार्गे वाशिमकडून हिंगोली जाणारा मार्ग बंद राहणार असल्यामुळे ही वाहतूक अकोला-नांदेड या राष्ट्रीय महामार्ग क्र. 161 वरील नवीन बायपासवरुन वळविण्यात येत आहे. 

No comments

Powered by Blogger.