Header Ads

वाशिम जिल्हयात २९ ऑक्टोबर पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश - Prohibition order in Washim District

वाशिम जिल्हयात २९ ऑक्टोबर पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश  - Prohibition order in Washim District


वाशिम जिल्हयात २९ ऑक्टोबर पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश 

       वाशिम, दि. 16 (जिमाका / www.jantaparishad.com) :  15 ऑक्टोबर रोजी घटस्थापना होवून नवरात्रौत्सव सुरु झाले आहे. स्थापन केलेल्या नवदुर्गा मुर्तीचे 25 ते 27 ऑक्टोबर या कालावधीत सार्वजनिक मिरवणूक काढून विसर्जन करण्यात येणार आहे. 24 ऑक्टोबर रोजी दसरा सण साजरा करण्यात येणार आहे. यादिवशी जिल्हयात विविध ठिकाणी रावण दहनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येते. तसेच दसऱ्याच्या दिवशी धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त मिरवणुका काढण्यात येतात. सद्यस्थितीत मराठा आरक्षणासंदर्भात विविध आंदोलनाचे आयोजन करण्यात येत आहे. जिल्हयात विविध पक्ष/संघटना/सामाजिक कार्यकर्ते यांचेकडून वेगवेगळ्या मागण्यांकरीता धरणे आंदोलने/ उपोषणे करण्यात येत आहेत.

           जिल्हा हा सण-उत्सवाच्या दृष्टीने तसेच राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे. वरील काळात जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था राखणे सुलभ व्हावे, याकरीता 29 ऑक्टोबरपर्यंत संपुर्ण जिल्हयात मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहे.

           हा आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी किंवा इतर शासकीय/निमशासकीय कर्मचारी किंवा विवाह,अंत्ययात्रा तसेच सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूकीस व कार्यक्रमास लागू राहणार नसल्याचे जिल्हादंडाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी आदेशात नमूद केले आहे.

No comments

Powered by Blogger.