Header Ads

विश्वमांगल्य सभा कारंजा द्वारे महिलांच्या भव्य कावड यात्रेचे आयोजन - Vishwa Mangalya Sabha Karanja Lad organised Mahila Kawad Yatra

 

विश्वमांगल्य सभा कारंजा द्वारे महिलांच्या भव्य कावड यात्रेचे आयोजन - Vishwa Mangalya Sabha Karanja Lad organised Mahila Kawad Yatra

विश्वमांगल्य सभा कारंजा द्वारे ३ सप्टेंबर रोजी महिलांच्या भव्य कावड यात्रेचे आयोजन

Mahila Kawad Yatra Organised by Vishwa Mangalya Sabha Karanja Lad

टिळक चौक नर्मदेश्वर मंदिर येथून निघणार भव्य शोभायात्रा.

कारंजा  दि ३१ - विश्वमांगल्य सभा महिलांचे अ.भारतिय स्तरावरील संघटन आहे. प्रत्येक कुटुंबातील आई देव, देश, धर्माचे चिंतन करणारी असावी या उद्देशाने हे कार्य तेरा वर्षांपुवी पासून अखंड सुरु आहे. राष्ट्राला बळकट करण्यात आईचा मोठा वाटा असल्याने आईला केंद्रस्थानी ठेऊन हे कार्य सुरु आहे. मागील तेरा वर्षापासून विश्व मांगल्य सभेमार्फत अनेक धार्मिक उपक्रम राबवण्यात येतात. श्रावण महिना म्हंटला की महादेवाची आराधना सर्वत्र केल्या जाते. भगवान शिवशंकरांची उपासना केली की आपल्या मनोकामना पूर्ण होतात. याच याच उदात्त हेतूने पवित्र श्रावण  महिन्याचे औचित्य साधून विश्वमांगल्य सभे ने कारंजा शहरात  रविवार, दिनांक 3 सप्टेंबर रोजी महिलांच्या कावड यात्रेचे भव्य आयोजन (Vishwa Mangalya Sabha Karanja Lad organised Mahila Kawad Yatra) केले आहे. शहरातील टिळक चौक येथे विराजमान असलेल्या नर्मदेश्वर. येथे दुपारी 1 वाजता शहरातील सर्व महिलांचे एकत्रिकरण करण्यात येईल. 

मागील वर्षी टिळक चौक येथील विहिरी मधून स्वयंभू श्रीनर्मदेश्वर शिवलिंग (Narmadeshwar mandir, Tilak Chouk, Karanja lad) निघाले होते आणि म्हणूनच या विहिरीतील जल नर्मदा मातेचे जल मानून तेथील पवित्र जल घेऊन दुपारी 2 वाजता आवड यात्रेला सुरुवात होईल. वाजत गाजत ही कावड यात्रा सिद्धेश्वर मंदिरामध्ये पोहोचेल. सिद्धेश्वर महादेवांची पूजा श्रीनृसिंह सरस्वती महाराजांचे आई व वडील करत होते, 700 वर्षाहून अधिक पुरातन महादेवाला राष्ट्राच्या कल्याणाची प्रार्थना संपूर्ण मातृशक्ती कडून करण्यात येईल. आणि कावडचे जल अर्पण करून समूहिक शिवमहिम्न अभिषेक होईल. जेव्हा दोन कलश एकत्रित पाण्याने भरून जेव्हा महादेवावर अभिषेक केला जातो तेव्हा कावडच्याच जलाने अभिषेक केला अशी मान्यता आहे. 

प्रत्येक महिलेने आपल्या सोबत दोन कलश घेऊन यावे व या पवित्र कार्यात मंगल वेष धारण करून, म्हणजे लाल किंवा पिवळी साडी मुलींनी लाल पिवळा पंजाबी सूट घालून सहभागी होऊन दिव्य अनुभव घ्यावा व पुण्याचे वाटेकरी व्हावे.  कारंजा शहरांमध्ये महिलांची कावड यात्रा पहिल्यांदाच निघत आहे तरी सर्व महिलांनी या यात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व मातृशक्तीचे प्रदर्शन करावे असे आवाहन विश्वमांगल्य सभा, शाखा कारंजा (Vishwa Mangalya Sabha Karanja Lad) च्या वतीने करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.