Header Ads

१० वी आणि १२ वीच्या पुनर्परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना संधी - Opportunity for successful students of 10th and 12th re-examination




१० वी आणि १२ वीच्या पुनर्परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना संधी

Opportunity for successful students of 10th and 12th re-examination 

       वाशिम, दि. 31 (जिमाका / www.jantaparishad.com) : इयत्ता १० आणि १२ वीच्या पुनर्परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील इयत्ता १० वी नंतरचे प्रथमवर्ष अभियांत्रिकी/ तंत्रज्ञान/ वास्तूकला पदविका, इयत्ता १२ वी नंतरचे औषध निर्माणशास्त्र, एचएमसीटी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी पदविका आणि इयत्ता १२वी/ आयटीआयनंतरचे थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता नोंदणी करण्यात येत आहे.

           महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ, पुणे यांच्या वतीने माहे जुलै व ऑगस्ट २३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इ. १० वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ. १२ वी पुरवणी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या प्रथमवर्ष पदविका, थेट द्वितीयवर्ष पदविका अभ्यासक्रमाच्या संस्थास्तरीय प्रवेशाकरीता पात्र आहे. त्यामुळे पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण होऊन प्रवेशास पात्र असलेल्या उमेदवारांना संस्थास्तरीय प्रथम व थेट द्वितीय वर्ष पदविका प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी संचालनालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अशा नोंदणी केलेल्या उमेदवारांना संस्थास्तरावरील प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल व प्रथमवर्ष पदविका आणि थेट द्वितीयवर्ष पदविका अभ्यासक्रमास प्रवेश निश्चित करता येईल.

            इ. १० वीनंतरचे प्रथमवर्ष अभियांत्रिकी/तंत्रज्ञान /वास्तूकला पदविका, इ. १२वी /आयटीआय नंतरचे थेट द्वितीयवर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेच्या संस्थास्तरीय जागासाठी ऑनलाईन नोंदणी व कागदपत्राची पडताळणी, अर्ज निश्चिती करणे या प्रक्रिया प्रवेशाच्या अंतिम तारखेपर्यंत म्हणजेच ८ सप्टेंबर २०२३ पर्यंत आणि इयत्ता १२ वी नंतरच्या औषध निर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमासाठी २० सप्टेंबर २०२३ पर्यंत सुरू ठेवल्या आहे. प्रवेशोत्सुक उमेदवारांनी https://dte.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन संबंधित प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहिती घ्यावी.

            संस्थास्तरावरील कोट्यामध्ये व कॅपनंतर रिक्त राहिलेल्या जागेवर प्रवेश घेण्यास इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी करून ई -स्क्रुटिनी पद्धत किंवा प्रत्यक्ष स्क्रुटिनी पद्धत याद्वारे कागदपत्राची पडताळणी व अर्ज निश्चित करणे आवश्यक आहे. अर्ज निश्चिती झाल्यानंतर अशा उमेदवारांनी प्रवेशासाठी संस्थेमध्ये स्वतंत्रपणे अर्ज करणे आवश्यक आहे. संस्थेकडे अर्ज केलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी, संस्था पातळीवर संस्थेद्वारे तयार केली जाईल व संस्थेने ठरवलेल्या वेळापत्रकाप्रमाणे प्रवेशप्रक्रिया संस्थेद्वारे राबविली जाईल. याकरिता इच्छुक उमेदवारांनी थेट संबंधित संस्थेकडे संपर्क साधून या संधीचा लाभ घ्यावा. असे तंत्र शिक्षण संचालनालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.