Header Ads

Registration as a voter : Name of colleges and camp dates in all six talukas of Washim district are as follows - वाशिम जिल्ह्यातील सहाही तालुक्यातील विविध महाविद्यालय चे नाव व शिबिराची तारीख पुढील प्रमाणे

Registration as a voter : Name of colleges and camp dates in all six talukas of Washim district are as follows - वाशिम जिल्ह्यातील सहाही तालुक्यातील विविध महाविद्यालय चे नाव व शिबिराची तारीख पुढील प्रमाणे

विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम

पात्र विद्यार्थ्यांची मतदार म्हणून होणार नांव नोंदणी

वाशिम जिल्ह्यातील सहाही तालुक्यातील विविध महाविद्यालय चे नाव व शिबिराची तारीख पुढील प्रमाणे 

वाशिम, दि. 02 (जिमाका / www.jantaparishad.com) :  भारत निवडणूक आयोगाने विशेष संक्षिपत पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नविन मतदार नांव नोंदणी वाढविण्याकरीता जिल्हयातील सर्व महाविद्यालयांमध्ये पात्र विद्यार्थ्यांची मतदार म्हणून नांव नोंदणी करण्याकरीता शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. 

याकरीता जिल्हास्तरीय पथक गठीत करण्यात आले असून पथक प्रमुख म्हणून उपजिल्हा निवडणूक अधिकारी तेजश्री कोरे, सहायक अधिकरी म्हणून शिक्षणाधिकारी (माध्यमिक), उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक नायब तहसिलदार सतिष काळे, सहायक कर्मचारी म्हणून निवडणूक विभागातील अव्वल कारकुन व निवडणूक संगणक ऑपरेटर हे असतील.

उपविभाग व तालुकास्तरीय पथक पुढीलप्रमाणे असतील. 

सहाही तालुक्यातील विविध महाविद्यालय चे नाव व शिबिराची तारीख पुढील प्रमाणे

वाशिम येथील राजस्थान महाविद्यालयकरीता मंगरुळपीरचे उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे हे पथक प्रमुख असतील. 

Colleges in Washim Taluka in Washim District

 वाशीम तालुका - 

  • 3 ऑगस्ट रोजी राजस्थान महाविद्यालयात शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. 
  • 4 ऑगस्ट रोजी श्री. शिवाजी हायस्कुल व डी.एड. कॉलेज वाशिम येथे शिबीर आयोजित केले असून वाशिमचे तहसिलदार गजेंद्र मालठाणे हे पथक प्रमुखास सहाय्यक असतील. 
  • 7 ऑगस्ट रोजी शासकीय तंत्रनिकेत वाशिम येथे आयोजित करण्यात येणाऱ्या शिबीराचे वाशिम गटविकास अधिकारी हे पथक प्रमुखास सहाय्यक असतील. 
  • 8 ऑगस्ट रोजी सन्मती इंजिनियरींग कॉलेज वाशिम, 
  • 9 ऑगस्ट रोजी मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालय वाशिम, 
  • 10 ऑगस्ट  रोजी तुळशिराम जाधव महाविद्यालय वाशिम, 
  • 11 ऑगस्ट रोजी बालाजी अद्यापक विद्यालय मालेगांव रोड वाशिम, 
  • 14 ऑगस्ट रोजी सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, रिसोड रोड, लाखाळा, वाशिम, 
  • 17 ऑगस्ट रोजी सरस्वती समाजकार्य महाविद्यालय, लाखाळा, रिसोड रोड, वाशिम, 
  • 18 ऑगस्ट रोजी श्री. रामराव सरनाईक शारिरीक शिक्षण महाविद्यालय वाशिम.

Colleges in Malegaon Taluka in Washim District

मालेगांव तालुका - 

  • 3 ऑगस्ट रोजी रामराव झनक महाविद्यालय मालेगांव, 
  • 4 ऑगस्ट रोजी स्व. पुंडलिकराव गवळी महाविद्यालय शिरपूर जैन, 
  • 7 ऑगस्ट रोजी विद्याभारती ज्यूनिअर आर्टस कॉलेज मेडशी, 
  • 8 ऑगस्ट रोजी कोंडबातात्या ढवळे ज्यूनिअर कॉलेज शिरपूर जैन, 
  • 9 ऑगस्ट रोजी वसंतराव नाईक कनिष्ठ महाविद्यालय, किन्हीराजा, 
  • 10 ऑगस्ट रोजी श्री. शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय, जऊळका रेल्वे, 
  • 11 ऑगस्ट  रोजी ना.ना. मुंदडा कनिष्ठ महाविद्यालय, मालेगांव, 
  • 14 ऑगस्ट रोजी एम.एस.जी. कनिष्ठ महाविद्यालय, शिरपूर जैन, 
  • 17 ऑगस्ट रोजी पीर मोहम्मद ऊर्दू कनिष्ठ महाविद्यालय, शिरपूर जैन, 
  • 18 ऑगस्ट रोजी मातोश्री सुमनबाई कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, मारसुळ.

Colleges in Karanja Taluka in Washim District 

कारंजा तालुका - 

  • 3 ऑगस्ट रोजी के.एन. कॉलेज, कारंजा (लाड), 
  • 7 ऑगस्ट रोजी श्री. कन्हैयालाल रामचंद्र इनानी महाविद्यालय, कारंजा (लाड), 
  • 8 ऑगस्ट रोजी चिंतामणी आर्ट व सायन्स महाविद्यालय, कामरगांव, 
  • 9 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय, कामरगांव, 
  • 10 ऑगस्ट रोजी जे.सी. हायस्कुल, कारंजा (लाड), 
  • 11 ऑगस्ट रोजी महात्मा गांधी उच्च माध्यमिक विद्यालय, लोहगांव, ता. कारंजा, 
  • 14 ऑगस्ट रोजी एम.जे. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, कारंजा, 
  • 17 ऑगस्ट रोजी श्री. नरसिंह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, धामणी (खडी), ता. कारंजा, 
  • 18 ऑगस्ट रोजी वसंत उच्च माध्यमिक विद्यालय, पोहा, ता. कारंजा.  

Colleges in Mangrulpir Taluka in Washim District  

मंगरुळपीर तालुका - 

  • 3 ऑगस्ट रोजी जि.प. (माजी शासकीय) माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, मंगरुळपीर, 
  • 4 ऑगस्ट रोजी यशवंतराव चव्हाण कला व विज्ञान महाविद्यालय, मंगरुळपीर, 
  • 7 ऑगस्ट रोजी यशवंतराव चव्हाण इंग्लिश हायस्कुल, मंगरुळपीर, 
  • 8 ऑगस्ट रोजी श्री. शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, वनोजा, 
  • 9 ऑगस्ट रोजी एन.बी. शेळके माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मंगरुळपीर, 
  • 10 ऑगस्ट रोजी अविनाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मंगरुळपीर, 
  • 11 ऑगस्ट रोजी व्ही.एन. ज्युनिअर कॉलेज, मंगरुळपीर, 
  • 14 ऑगस्ट रोजी एस.एम. आर्ट व कॉमर्स कॉलेज 
  • 17 ऑगस्ट रोजी एम.आय. ज्युनिअर कॉलेज, कंझारा, 
  • 18 ऑगस्ट रोजी सुरेशभाऊ जैन ज्यूनिअर सायन्स कॉलेज, शेलू बाजार.

Colleges in Manora Taluka in Washim District 

मानोरा तालुका - 

  • 3 ऑगसट रोजी श्री. भगवंतराव विद्यालय ॲन्ड ज्यूनिअर कॉलेज, गिरोली, 
  • 4 ऑगस्ट रोजी श्री. मुंगसाजी महाराज सेंकडरी ॲन्ड हायर सेंकडरी हायस्कुल, इंझोरी, 
  • 7 ऑगस्ट रोजी वसंतराव नाईक सेंकडरी हायस्कुल फुलउमरी, 
  • 8 ऑगस्ट रोजी बियाँड ट्राईब ज्यूनिअर कॉलेज, माहुली, 
  • 9 ऑगस्ट रोजी लाटे विठ्ठलराव अढाव ज्यूनिअर कॉलेज, शेंदुर्जना, 
  • 10 ऑगस्ट रोजी आयटीआय कॉलेज, मानोरा, 
  • 11 ऑगस्ट आप्पास्वामी महाविद्यालय, शेंदुर्जना अढाव, 
  • 14 ऑगस्ट रोजी एलएसपीएम उच्च माध्यमिक विद्यालय, धामणी (मानोरा), 
  • 17 ऑगस्ट रोजी मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय, मानोरा, 
  • 18 ऑगस्ट रोजी रहिमानिया ऊर्दू हायस्कुल, मानोरा.

Colleges in Risod Taluka in Washim District 

रिसोड तालुका - 

  • 3 ऑगस्ट रोजी - विज्ञान महाविद्यालय रिसोड, 
  • 4 ऑगस्ट  रोजी - आयटीआय कॉलेज रिसोड, 
  • 7 ऑगस्ट रोजी - बगडीया कॉलेज रिसोड, 
  • 8 ऑगस्ट रोजी - भारत इंग्लिश स्कुल ज्युनिअर कॉलेज, चिचांबाभर, 
  • 9 ऑगस्ट रोजी - शंभूराजे ज्युनिअर कॉलेज रिठद, 
  • 10 ऑगस्ट रोजी - महाविद्यालय, देगांव, 
  • 11 ऑगस्ट रोजी - बि फॉर्मसी महाविद्यालय, रिसोड आणि 
  • 14 ऑगस्ट रोजी - कृषी महाविद्यालय करडा येथे विद्यार्थ्यांची नांव नोंदणी होणार आहे. 

संबंधित उपविभागाचे उपविभागीय अधिकारी हे पथक म्हणून, पथक प्रमुखास सहायक अधिकारी म्हणून संबंधित तहसिलचे तहसिलदार, गटविकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, नायब तहसिलदार व संबंधित तहसिल कार्यालयाचे कर्मचारी तसेच संगणक ऑपरेटर हे काम पाहतील.

No comments

Powered by Blogger.