महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ, कारंजा यांचे निवेदन - Nivedan by Maharashtra Bahujan Patrakar Sangh Karanja lad
पत्रकार संदीप महाजन याचे वर हल्ला करविणारे आ.किशोर पाटील यांना निलंबित करा
महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ कारंजा यांचे निवेदन
कारंजा दि १८ (www.jantaparishad.com) - जळगाव जिल्ह्यातील पत्रकार संदीप महाजन यांचेवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे वतीने महामहीम राज्यपाल यांना निवेदन देऊन हल्ला घडून आणणारे शिंदे गटा चे आमदार किशोर पाटील याचे प्रतिनिधीत्व रद्द करावे. कटात प्रत्यक्ष सहभागी असलेल्या गुंडांना अटक करून पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत अजामीनपात्र गुन्हे नोंदवून कार्यवाही करावी अशी मागणी महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघ कारंजाने निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदन देते वेळी महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष बंडू भाऊ इंगोले तालुका अध्यक्ष आरिफ पोपटे तालुका उपाध्यक्ष रामदास मिसाळ सचिव मोहम्मद मुन्नीवाले, सलीम खान शेरखान, आशिष धोंगडे, दामोदर जोंधळेकर, विनोद गणवीर, गालीब पटेल, संदीप कुरहे, उषा नाईक, मयूर राऊत, महेंद्र गुप्ता, रहीम गारवे, महादेव काठोळे, पवन कदम, विजय भड, धनराज राठोड, सुधीर देशपांडे, मंगेश बाबरे, दीपक इंगळे, इस्माईल बेनीवाले, गजानन टोम्पे, मोनाली गणवीर, विजय काळे, उमेश देशमुख आदींची उपस्थिती होती.यावेळी आ.किशोर पाटील याचा निषेध करण्यात आला.
Post a Comment