Header Ads

विणकर सेवा केंद्र, नागपूर यांच्या वतीने समयमती ग्रामोद्योग केंद्र, कारंजा येथे “समर्थ प्रशिक्षण शिबिरा" चे शुभारंभ - Inauguration of Training Camp by Vinkar Seva Kendra, Nagpur

 

विणकर सेवा केंद्र, नागपूर यांच्या वतीने समयमती ग्रामोद्योग केंद्र, कारंजा येथे “समर्थ प्रशिक्षण शिबिरा" चे शुभारंभ - Inauguration of Training Camp by Vinkar Seva Kendra, Nagpur


विणकर सेवा केंद्र, नागपूर यांच्या वतीने समयमती ग्रामोद्योग केंद्र, कारंजा येथे “समर्थ प्रशिक्षण शिबिरा" चे शुभारंभ 

कारंजा दि १८ (www.jantaparishad.com) - भारत सरकार, वस्त्र मंत्रालय, विकास आयुक्त कार्यालय (हातमाग), विणकर सेवा केंद्र, नागपूर यांच्या वतीने १८ ऑगस्ट 2023 रोजी समयमती ग्रामोद्योग केंद्र, कारंजा लाड, वाशिम येथे “समर्थ प्रशिक्षण शिबिरा" चे  शुभारंभ सुरेशजी पुरुषोत्तम तांगडे यांच्या अध्यक्षतेखाली व  संदीप ठुबरीकर ,केंद्र उपनीदेशक बुनकर सेवा केंद्र नागपूर यांच्या उपस्थितीत पार पडले.या कार्यक्रमाला सुदेश गुळकरी व हितेश रुईवाले विशेष अतिथी म्हणून् उपस्थितीत होते.


11:00 वाजता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून समारंभाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.  नागपुरातील विणकर सेवा केंद्राचे उपनीदेशक संदीप ठुबरीकर यांनी वरील पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व शिबिराचे महत्व सांगताना भारत सरकारकडून हातमाग क्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. त्याच्या फायद्यांविषयी माहिती.व ज्या 30  महिला प्रशिक्षण घेणार आहे त्यांना किट देण्यात आली.

कार्यक्रम दरम्यान, इंडिया हँडलूम ब्रँड, हातमाग मार्क, विणकर मित्र मदत केंद्र, विणकर मुद्रा योजना, विणकरांची ऑनबोर्डिंग नोंदणी, समर्थ प्रशिक्षण कार्यक्रम आणि विणकर व विणकरांसाठी भारत सरकारतर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.शेवटी आभार प्रदर्शन अधीक्षक (विणकाम)  नरेश वरघणे  यांनी केले.

No comments

Powered by Blogger.