Header Ads

पोस्ट ऑफिसमध्ये राष्ट्रध्वज विक्रीस उपलब्ध - National flag available for sale at post office

पोस्ट ऑफिसमध्ये राष्ट्रध्वज विक्रीस उपलब्ध - National flag available for sale at post office


१३ ते १५ ऑगस्ट : 'हर घर तिरंगा' अभियान

पोस्ट ऑफिसमध्ये राष्ट्रध्वज विक्रीस उपलब्ध

National flag available for sale at post office

वाशिम,दि.११ (जिमाका / www.jantaparishad.com) - संपूर्ण देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्यात येत आहे.भारतीय डाक विभागाकडून 'हर घर तिरंगा' हे अभियान राबविले जाणार आहे.नागरिकांना राष्ट्रध्वज उपलब्ध व्हावा,या उद्देशाने अकोला डाक विभागाने त्यांच्या सर्व कार्यालयांमध्ये राष्ट्रध्वजाची विक्री करण्याचा निर्णय (National flag available for sale at post office) घेतला आहे. 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 'हर घर तिरंगा'  अभियान (Har Ghar Tiranga Abhiyan 2023) सुरू करण्यात आले आहे. २०२२ मध्ये देशभरातील सुमारे २३ कोटी घरांतील नागरिकांनी त्यांच्या घरावर प्रत्यक्ष तिरंगा फडकविला होता.या उपक्रमात टपाल विभागाने मोठे योगदान दिले होते. यावर्षीही देशभक्तीची हीच भावना समोर ठेवून भारत सरकारने १३ ते १५ ऑगस्ट या काळात 'हर घर तिरंगा अभियान राबविण्याचे निश्चित केले आहे.

अकोला विभागातील टपाल कार्यालयातून राष्ट्रध्वजांची विक्री सुरू करण्यात आली आहे. ७ ऑगस्ट पासून अकोला डाक विभागातील सर्व पोस्ट ऑफिस च्या माध्यमातून सामान्य नागरिकांना तिरंगा झेंडा केवळ २५ रुपयामध्ये उपलब्ध करून दिला जाणार आहे. एवढेच नव्हे तर ही सेवा पोस्टमनच्या माध्यमातून घरपोच देण्याचा संकल्प अकोला डाकविभागाने व्यक्त केला आहे.त्या अनुषंगाने www.epostoffice.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाची खरेदी करता येणार आहे. ऑनलाइन ई-टपाल ' राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या या कार्यक्रमाशी नागरिक जोडले जावेत, या उद्देशाने टपाल कार्यालयाने हा उपक्रम हाती घेतला आहे.नागरिकांना त्यांच्या घरावर, तसेच कार्यालयांवर फडकवलेल्या राष्ट्रध्वजाचे फोटो, सेल्फी #HarGharTiranga या #indiapost4Tiranga #HarDilTiranga हॅशटॅगसह समाज माध्यमांवर अपलोड करता येईल.

वाशिम मुख्य डाकघर यांच्या माध्यमातून नागरिकांना तिरंगा झेंडा उपलब्ध करून दिला जाणार आहे. यासाठी वाशीम डाक उपविभागातील सर्व कर्मचारी परिश्रम घेत आहेत. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान ही मोहीम संपूर्ण देशभरात राबवली जात आहे.वाशीमच उपविभागाचे डाक निरीक्षक निलेश वायाळ तसेच एसपीएम ज्ञानेश्वर होनमने यांनी सर्व नागरिकांना या मोहिमेचा लाभ घेऊन ही मोहीम १००% यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.

No comments

Powered by Blogger.