Header Ads

महाराष्ट्रातील जिल्हे आणि ध्वजारोहण करणारे मंत्री पुढीलप्रमाणे - Districts & Flag hoisting Ministers List

महाराष्ट्रातील जिल्हे आणि ध्वजारोहण करणारे मंत्री पुढीलप्रमाणे - Districts & Flag hoisting Ministers List


स्वातंत्र्यदिनी जिल्हा मुख्यालयात ध्वजारोहण समारंभासाठी मान्यवरांचा शासन निर्णय निर्गमित

वाशिम येथे ना. दिलीप वळसे-पाटील तर ना. संजय राठोड यवतमाळ ला करणार ध्वजारोहण 

मुंबई, दि. 11 : भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७६ वा वर्धापन दिन राज्यभर १५ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. मंत्रालय येथे आयोजित राज्याच्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पुणे येथे राज्यपाल रमेश बैस हे ध्वजारोहण करणार आहेत.

जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी आयोजित शासकीय समारंभात करण्यात येणाऱ्या ध्वजारोहणासंदर्भातील परिपत्रक सामान्य प्रशासन विभागाने जारी केले आहे.

नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर कोल्हापूर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. अन्य जिल्ह्यांच्या ठिकाणी होणाऱ्या ध्वजारोहणासाठी मंत्री व जिल्हाधिकारी या मान्यवरांची यादी (Districts & Flag hoisting Ministers List) पुढील प्रमाणे –

अमरावती – मंत्री छगन भुजबळ

चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार,

रायगड – चंद्रकांत पाटील,

वाशिम – दिलीप वळसे-पाटील,

अहमदनगर – राधाकृष्ण विखे-पाटील,

नाशिक – गिरीष महाजन,

धुळे – दादाजी भुसे,

जळगाव – गुलाबराव पाटील,

ठाणे – रविंद्र चव्हाण,

सोलापूर – हसन मुश्रीफ,

सिंधुदुर्ग – दिपक केसरकर,

रत्नागिरी – उदय सामंत,

परभणी – अतुल सावे,

औरंगाबाद – संदीपान भुमरे,

सांगली – सुरेश खाडे,

नंदुरबार – विजयकुमार गावीत,

उस्मानाबाद – तानाजी सावंत,

सातारा – शंभूराज देसाई,

जालना – अब्दुल सत्तार

यवतमाळ -संजय राठोड

बीड – धनंजय मुंडे,

गडचिरोली – धर्मराव अत्राम

मुंबई उपनगर –मंगल प्रभात लोढा

लातूर –संजय बनसोडे

बुलढाणा –अनिल पाटील

पालघर –आदिती तटकरे,

हिंगोली – जिल्हाधिकारी हिंगोली

वर्धा – जिल्हाधिकारी वर्धा

गोंदिया – जिल्हाधिकारी गोंदिया

भंडारा – जिल्हाधिकारी भंडारा

अकोला – जिल्हाधिकारी अकोला

नांदेड – जिल्हाधिकारी नांदेड

कोकण भवन येथे विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.