Header Ads

सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा दौरा कार्यक्रम - Cooperation Minister Dilip Valse Patil Program Schedule

सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा दौरा कार्यक्रम - Cooperation Minister Dilip Valse Patil Program Schedule

वाशीम येथे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील दोन दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर 

वाशीम दि.13 (जिमाका / www.jantaparishad.com) - सहकार मंत्री दिलीप वळसे - पाटील हे भारतीय स्वातंत्र्याच्या 76 वर्धापन दिनानिमित्त 15 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 9:05 वाजता प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे ध्वजारोहण करतील.

सहकार मंत्री दिलीप वळसे - पाटील (Cooperation Minister Dilip Valse Patil) हे 14 आणि 15 ऑगस्ट रोजी दोन दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम (Program Schedule) पुढीलप्रमाणे.

14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता शासकीय मोटारीने नागपूर येथून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाने वाशिमकडे प्रयाण.रात्री 9.30 वाजता शासकीय विश्रामगृह, वाशिम येथे आगमन व मुक्काम. 

15 ऑगस्ट रोजी 

  • सकाळी 8:30 वाजता मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय,वाशिमकडे प्रयाण.
  • सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन. 
  • जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी 9:05 वाजता भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रध्वजारोहण करतील. 
  • सकाळी 10:30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून मोटारीने कारंजा (लाड) कडे प्रयाण करतील.
  • सकाळी 11:30 वाजता कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती, सभापती यांचे निवासस्थान येथे आगमन व राखीव. दुपारी 12:30 वाजता कारंजा (लाड) येथील वन पर्यटन केंद्र येथे आगमन व वन पर्यटन केंद्राच्या प्रकाशदादा डहाके निसर्ग पर्यटन केंद्राच्या नामकरण सोहळ्याला उपस्थिती.
  • दुपारी 1 वाजता शेतकरी निवास,मंगरूळपीर रोड,कारंजा (लाड) येथे आयोजित सभेला उपस्थित राहून 
  • दुपारी 3 वाजता शासकीय मोटारीने कारंजा (लाड) येथून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरकडे प्रयाण करतील.

No comments

Powered by Blogger.