Header Ads

Praful Totavad appointed as BDO Karanja lad - कारंजा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी प्रफुल्ल तोटावाड

Praful Totavad appointed as BDO Karanja lad - कारंजा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी प्रफुल्ल तोटावाड

कारंजा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी प्रफुल्ल तोटावाड

Praful Totavad appointed as BDO Karanja lad

कारंजा दि.16 (www.jantaparishad.com) - कारंजा पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी वर्ग एक पदी प्रफुल्ल तोटावाड (Praful Totavad appointed as BDO Karanja lad) यांची शासनाच्या वतीने नियुक्ती करण्यात आली आहे.  तोटावाड यांनी दिनांक 14 रोजी आपला पदभार स्विकारला आहे. यानिमित्त विविध ‍ लोकप्रति  निधी व कर्मचारी यांच्या वतीने पुष्पगुच्छ व  बुके देऊन सत्कार करण्यात आला.

तालुक्यातील घरकुल, स्वच्छता, पाणी पुरवठा योजना, आरोग्य व इतर योजनांना गती देऊन सर्वसामान्यांसाठी पुर्ण निष्ठेने काम करणार असल्याची भावना गटविकास अधिकारी पदी प्रफुल्ल तोटावाड यांनी बोलुन दाखवली. याआधी मागील सुमारे एक वर्षापासुन ते ‍ वाशीम जिल्हा ‍ परिषदेत परिविक्षाधीन  अ धिकारी म्हणुन कार्यरत होते. तसेच त्यांच्याकडे  वाशीम पंचायत समितीचे गट विकास अधिकारी पदाचा प्रभार होता. 

आता शासनाच्या वतीने त्यांना कारंजा पंचायत समिती (Karanja Lad Panchayat Samiti) गटविकास अधिकारी (BDO) पदी  नियुक्ती मिळाली असुन ‍जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी वाशीम पंचायत समिती गट विकास अधिकारी पदाचा अतिरिक्त  प्रभारही तोटावाड यांना दिला आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.