Kankubai Girl's High School Student's Success in Scholarship : कंकुबाई माध्यमिक कन्या शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश
कंकुबाई माध्यमिक कन्या शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश
कारंजा दि.१६ (www.jantaparishad.com) - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे तर्फे घेण्यात आलेल्या २०२२-२३ च्या शिष्यवृत्ती परीक्षेत स्थानीक कंकुबाई माध्यमिक कन्या शाळेतील विद्यार्थिनींनी सुयश संपादन केले आहे.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ५ वी च्या गुणवत्ता यादीत एका विद्यार्थिनीने स्थान प्राप्त केले आहे. वर्ग ५ वी ची विद्यार्थिनी कु.अनुश्री हरिदास गंद्रे - ३२ वी मेरीट आली आहे.
तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.८ वी च्या चार विद्यार्थिनींनी गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे. यामध्ये कु.अनुष्का संजय निकडे - ११ वी मेरीट, कु.समृद्धी संदीप घाटे - १९ वी मेरीट, कु.तनुष्का संजय देशमुख - ५४ वी मेरीट, कु.श्रद्धा संजय वानखडे - ५५ वी मेरीट आली आहे.
या सर्व गुणवंत विद्यार्थिनींचे अभिनंदन व कौतुक होत आहे.
Post a Comment