Header Ads

२५ व २६ जूलै ऑनलाईन रोजगार मेळावा - ONLINE ROJGAR MELAWA 2023 - WASHIM on 25th and 26th July

वाशिम येथे २५ व २६ जूलै ऑनलाईन रोजगार मेळावा - ONLINE ROJGAR MELAWA 2023 - WASHIM on 25th and 26th July

 २५ व २६ जूलै ऑनलाईन रोजगार मेळावा

ONLINE ROJGAR MELAWA 2023 - WASHIM on 25th and 26th July

वाशिम,दि.२१(जिमाका / www.jantaparishad.com) जिल्हयातील नोकरी / रोजगार इच्छूक उमेदवारांना नोकरीच्या संधी प्राप्त व्हाव्यात या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम कार्यालयाच्या वतीने २५ ते २६ जूलै २०२३ दरम्यान ऑनलाईन रोजगार मेळावा (ONLINE ROJGAR MELAWA 2023 - WASHIM on 25th and 26th July) आयोजित केला आहे.

         या ऑनलाईन मेळाव्यामध्ये क्रेडीट ॲक्सेस ग्रामीण, वाशिम / अकोला, हयोसुंग इंडीया प्रा.लि. छत्रपती संभाजीनगर, हिताचि आस्टेमो ब्रेक सिस्टिम इंडीया, प्रा.लि. बांभोरी - जळगांव, एल.आय.सी.विमा कार्यालय, वाशिम, पिपल ट्री व्हेन्चर्स प्रा. लि. पूणे / छत्रपती संभाजीनगर धुत ट्रॉन्समिशन प्रा.लि.छत्रपती संभाजीनगर इत्यादी नामांकित कंपनी /उद्योगाकडील उद्योजक वा त्यांचे प्रतिनिधी मेळाव्यात ऑनलाईन सहभाग नोंदविलेल्या नोकरी इच्छूक उमेदवारांच्या पुढील टप्प्यात ऑनलाईन / प्रत्यक्ष मुलाखती घेवून निवड प्रक्रिया पूर्ण करतील.

यासाठी १० वी (SSC), १२ वी (HSC), आय.टी.आय. (ITI) (सर्व ट्रेडस्), पदवीधर (Graduate) (कला/वाणिज्य/विज्ञान), पदव्युत्तर पदवी (Post Graduate) (सर्व शाखा) इ. शैक्षणीक पात्रता असणारे वयोमर्यादा - १८ ते ४५ मधील युवक-युवतीना ६८ पदांकरीता रोजगार मिळविण्याची संधी प्राप्त होणार आहे.

      या अनुषंगाने वाशिम व इतर जिल्हयातील रोजगार इच्छुक स्त्री/पुरुष उमेदवारांना www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने विविध पदासाठी शैक्षणिक पात्रतेनुसार पसंतीक्रम नोंदवून सहभागी होता येणार आहे.ऑनलाईन रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होणा-या उमेदवारांना त्यांचेकडील सेवायोजन कार्डच्या युझरनेम व पासवर्डमधुन मेळाव्यात सहभागी होता येईल.असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केन्द्राचे सहायक आयुक्त,प्रफुल्ल शेळके यांनी केले आहे.

               या रोजगार मेळाव्यात ऑनलाईन पध्दतीने सहभागी होण्याची प्रक्रीया/ पध्दत पुढील प्रमाणे आहे.एम्पॉयमेंट कार्डमधील युझरनेम व पासवर्ड असावे. rolgar नसल्यास www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवरील Job Seeker वरील Register वरुन युझरनेम व पासवर्ड मिळवावा त्यानुसार सहभागी झालेल्या,त्यानंतर Job Seeker च्या विंडोमध्ये लॉगीन करुन डाव्या बाजुकडील पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर वर क्लीक करावे. वाशिम जिल्हा निवडुन त्यातील ONLINE ROJGAR MELAWA 2023 - WASHIM मध्ये नमुद पात्रतेनुसार पदांवर अप्लाय करावे.त्यावेळी Applied असा मेसेज दिसेल.या पध्दतीने ऑनलाईन मेळाव्यात सहभागी होता येईल.नोंदणीबाबत काही अडचणी असल्यास कार्यालयाच्या दुरध्वनी क्र. ०७२५२ - २३१४९४ या दुरध्वनीवर संपर्क साधावा.

No comments

Powered by Blogger.