Header Ads

Mahila Lokshahi Din in Washim on 17 July : वाशिम येथे 17 जुलै रोजी महिला लोकशाही दिन

Mahila Lokshahi Din in Washim on 17 July : वाशिम येथे 17 जुलै रोजी महिला लोकशाही दिन


वाशिम येथे 17 जुलै रोजी महिला लोकशाही दिन

Mahila Lokshahi Din in Washim on 17 July

        वाशिम, दि. 14 (जिमाका / www.jantaparishad.com) : समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या तक्रारी व अडचणींचे शासकीय यंत्रणेकडून निराकरण करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जर या दिवशी सार्वजनिक सुट्टी असेल तर त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन (Mahila Lokshahi Din in Washim on 17 July) करण्यात येते.

          जुलै 2023 या महिन्याचा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 17 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला आहे. महिला लोकशाही दिनात अर्ज स्वीकृतीचे निकष पुढीलप्रमाणे आहे. तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावेत. तक्रार/विनेदन दोन प्रतीत सादर करावे. सदर प्रकरण न्याय प्रविष्ट नसावे. अर्ज विहीत नमुन्यात व आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करावा. सेवा व आस्थापनाविषयक बाबी विचारात घेतल्या जाणार नसल्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी कळविले आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.