Kotwal Pad Bharati Karanja lad - SDM Appeal - Don't give Bribe : कोतवाल पदभरती कारंजा : आर्थिक देवाण-घेवाण करु नये - उपविभागीय अधिकारी कारंजा यांचे आवाहन
कोतवाल पदभरती कारंजा : आर्थिक देवाण-घेवाण करु नये
उपविभागीय अधिकारी कारंजा यांचे आवाहन
वाशिम,दि.१४ (जिमाका / www.jantaparishad.com) - जिल्ह्यातील तहसिल कार्यालय,कारंजा व मानोरा अंतर्गत येणाऱ्या कार्यक्षेत्राकरिता उपविभागीय अधिकारी कारंजा यांचे अध्यक्षतेखाली कोतवाल पदभरती- 2023 ची प्रक्रिया सुरु आहे.ही कोतवाल पदभरती प्रक्रिया (Kotwal Pad Bharati Karanja lad) अत्यंत पारदर्शक पध्दतीने करण्यात येत आहे.या पदभरती संदर्भात कोणत्याही अपप्रचाराला बळी पडून कोणीही कोणत्याही प्रकारची आर्थिक देवाण-घेवाण (SDM Appeal - Don't give Bribe) करु नये.तसेच असा अपप्रचार करणाऱ्या व्यक्तींना समर्थन करु नये.
जिल्ह्यातील कारंजा उपविभागातील कारंजा व मानोरा तालुक्यातील कोतवाल पदभरतीची प्रक्रिया अत्यंत पारदर्शपणे पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे,असे आवाहन कारंजा उपविभागीय अधिकारी ललित वऱ्हाडे (Lalit Varhade, Sub Divisional Office, Karanja Lad) यांनी केले आहे.
Post a Comment