Header Ads

दि.२२जुलै : नैसर्गिक आपत्ती वाशिम जिल्ह्यातील गत २४ तासातील प्रार्थमिक अहवाल - July 22: Preliminary report of natural calamity in Washim district of last 24 hours

दि.२२जुलै : नैसर्गिक आपत्ती वाशिम जिल्ह्यातील गत २४ तासातील प्रार्थमिक अहवाल - July 22: Preliminary report of natural calamity in Washim district of last 24 hours


दि.२२जुलै : नैसर्गिक आपत्ती वाशिम जिल्ह्यातील २४ तासातील प्रार्थमिक अहवाल

जिल्ह्यात २ पशूधन मृत व १४ घरांची अंशतः पडझड  

वाशिम,दि.२२ (जिमाका / www.jantaparishad.com) जिल्ह्यात २२ जुलै रोजी सकाळी १० वाजेपर्यंत मागील २४ तासात सरासरी ३३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सकाळपासूनच सुरू असलेला संततधार पाऊस व पुरामुळे पशुधन व घरांची पडझड आदी नुकसान झाले.      

प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार मानोरा तालुक्यात २ जनावरे मृत्युमुखी पडली. मानोरा तालुक्यात ४, मंगरूळपीर तालुक्यात २, रिसोड तालुक्यात १ व कारंजा तालुक्यात ७ अशा एकूण १४ घरांची अंशतः पडझड झाली. आज २२ जुलै रोजी जिल्ह्यात कारंजा,मानोरा, मालेगाव व मंगरूळपीर तालुक्यात पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने पिक व शेतजमीनीच्या नुकसानीची माहिती तालुकास्तरावरून सद्यस्थितीत अप्राप्त असल्यामुळे शेत पिकांचे व जमिनीचे नुकसान या प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आलेले नाही.

No comments

Powered by Blogger.