वाशिम जिल्हा प्रशासनाचे आवाहन - Flood situation Appeal by Washim district administration
नागरीकांनो ! पूर परिस्थीतीमध्ये दक्षता घ्या
वाशिम जिल्हा प्रशासनाचे आवाहन
वाशिम,दि.१९ (जिमाका / www.jantaparishad.com) - प्रादेशिक हवामान विभाग,नागपूर यांनी विदर्भात पुढील ७ दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. काही ठिकाणी रेड अलर्ट व यलो अलर्ट याप्रमाणे जिल्हानिहाय अनुमान दिले आहे.त्यानुसार वाशिम जिल्हा हा यलो अलर्टमध्ये दर्शविण्यात आला आहे. जिल्हयातील नागरीकांनी यलो अलर्टची सूचना लक्षात घेता पुढील ७ दिवस जिल्हयात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास होणाऱ्या पावासाचा अंदाज घेऊनच कामकाजाचे नियोजन करावे. नदी- नाल्यांना पूर आल्यास त्याठिकाणाहून व पुलावरुन रस्ता ओलांडू नये.तसेच नागरीकांनी पुराचे पाणी पाहण्यासाठी नदी-नाल्याच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे.
पूर परिस्थतीमध्ये काय करावे
पूर परिस्थीतीत उंच ठिकाणी जावे. विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वीज पुरवठा बंद करावा.गावात/घरात जंतुनाशके असतील तर ते पाण्यात विरघळणार नाहीत याची दक्षता घ्यावी. पूरासंदर्भात पूर्वकल्पना मिळाल्यास घरातील उपयुक्त सामान व महत्वाची कागदपत्रे सुरक्षित ठिकाणी घेवून जावी.
पूर परिस्थीमध्ये काय करु नये
पूर असलेल्या भागात विनाकारण भटकू नये.पुराच्या पाण्यात चूकुनही जावू नये.दुषित व उघडयावरचे अन्न व पाण्याचे सेवन करणे टाळावे. पुलावरुन पाणी वाहत असतांना पूल ओलांडू नये. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
Post a Comment