Header Ads

कारंजाचे उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांचे जनतेला आवाहन - Appeal by SDM Karanja lad

कारंजाचे उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांचे जनतेला आवाहन - Appeal by SDM Karanja lad

नागरीकांनी पावसाचा अंदाज घेऊनच त्यांचे कामकाजाचे नियोजन करावे

कारंजाचे उपविभागीय अधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांचे जनतेला आवाहन

कारंजा (www.jantaparishad.com) दि. १९ - प्रादेशिक मौसम केंद्र, भारत मौसम विज्ञान विभाग, नागपूर यांनी विदर्भामध्ये पुढील 7 दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे अनुमान दिले असुन काही ठिकाणी रेड अलर्ट, यलो अलर्ट याप्रमाणे जिल्हानिहाय अनुमान दिलेले आहे. त्यानूसार वाशिम जिल्हा हा यलो अलर्ट (Yellow alert in Washim District) यलो मध्ये दर्शविण्यात आलेला आहे. 

तरी कारंजा उपविभागातील (कारंजा व मानोरा तालुक्यातील) सर्व नागरीकांनी पुढील 7 दिवस उपविभागामध्ये होणाऱ्या पावसाचा अंदाज घेऊनच त्यांचे कामकाजाचे नियोजन करावे. तसेच नदी-नाल्यांना पावसामुळे पुर आल्यास त्याठिकाणाहून / पुलावरुन रस्ता ओलांडू नये व नागरीकांनी पुराचे पाणी पाहण्यासाठी नदी-नाल्यांचे ठिकाणी जाण्याचे टाळावे.असे आवाहन ललितकुमार वऱ्हाडे उपविभागीय अधिकारी, कारंजा यांनी केले आहे. 

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.