Header Ads

'Vartalap' : Broadcasting Workshop By PIB on 15 June in Washim - पत्र सूचना कार्यालयाच्या वतीने एकदिवसीय प्रसार माध्यम कार्यशाळा - ‘वार्तालाप’चे आयोजन

'Vartalap' : Broadcasting Workshop By PIB on 15 June in Washim - पत्र सूचना कार्यालयाच्या वतीने एकदिवसीय प्रसार माध्यम कार्यशाळा - ‘वार्तालाप’चे आयोजन


पत्र सूचना कार्यालयाच्या वतीने एकदिवसीय प्रसार माध्यम कार्यशाळा - ‘वार्तालाप’चे आयोजन

'Vartalap' : Broadcasting Workshop By PIB on 15 June in Washim 

15 जून रोजी वाशिम येथे निमंत्रित पत्रकारांसाठी आयोजन

        वाशिम दि.14 (जिमाका/www.jantaparishad.com) - केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालया च्या पत्र सूचना कार्यालय मुंबई (PIB Mumbai) च्या वतीने वाशिम येथे निमंत्रित पत्रकारांसाठी गुरुवारी 15 जून रोजी एक दिवसीय प्रसार माध्यम कार्यशाळा –वार्तालाप’ चे आयोजन ('Vartalap' : Broadcasting Workshop By PIB on 15 June in Washim) करण्यात आले आहे.कार्यशाळेचे उद्‌घाटन सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस (Washim Collector Shanmugrajan S) यांच्या हस्ते आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वसुमना पंत (Washim ZP (Zilla Parishad) CEO (Chief Executive Officer) Mrs. Vasumana Pant) यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. पत्र सूचना कार्यालयाच्या उपसंचालक श्रीमती जयदेवी पुजारी-स्वामी (PIB Deputy Director Mrs. Jayadevi Pujari-Swami), माध्यम आणि संवाद अधिकारी धनंजय वानखेडे (Media and Communication Officer Dhananjay Wankhede) यांची उद्‌घाटन सत्राला उपस्थिती असणार आहे.

        केंद्र सरकारच्या योजना आणि कार्यक्रमांबाबतच्या माहितीच्या प्रसाराचे कार्य करणारे पत्र सूचना कार्यालय ही महत्वपूर्ण संस्था आहे.हे कार्यालय थेट जनतेपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार आणि प्रसारमाध्यम यांच्यातील मुख्य दुवा आहे.केंद्र सरकारच्या 9 व्या वर्धापन दिनानिमित्त आणि सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या संकल्पनेशी निगडीत हा वार्तालाप आहे.वाशिम हा जिल्हा निती आयोगाने आकांक्षित जिल्हा म्हणून घोषित केला आहे. या जिल्ह्यांमध्ये प्रथमच पत्र सूचना कार्यालय या प्रसारमाध्यम कार्यशाळेचे आयोजन करत आहे.

        वाशिम येथील हॉटेल इव्हेंटो,अकोला रोड,येथे सकाळी 10 ते सायंकाळी 4.30 यावेळेत आयोजित या कार्यशाळेत उद्घाटन सत्रानंतर प्रसारमाध्यम प्रतिनिधीसाठी विविध विषयावरील मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. वाशिमचे जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास ) राजेश सोनखासकर हे ‘आकांक्षित जिल्हा विकास कार्यक्रमात माध्यमांची भूमिका’ या विषयावरील सादरीकरण करतील. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती अनिसा महाबळे या ‘आकांक्षित जिल्हे उपक्रमांतर्गत कृषी आणि कृषी संलग्न क्रिया-प्रक्रियांशी संबंधित क्षमता’ या विषयावर तर ‘ग्रामीण भागातील आर्थिक साक्षरता’ या विषयावर वरिष्ठ पत्रकार वीरेंद्र तळेगावकर प्रसार माध्यम प्रतिनिधींना मार्गदर्शन करतील.

        तिसऱ्या सत्रामध्ये पत्र सूचना कार्यालय मुंबईच्या उपसंचालक श्रीमती जयदेवी पुजारी स्वामी ‘विकासाभिमुख संवादात ग्रामीण माध्यमांचे योगदान आणि माध्यमांकडून नागरिकांना उत्तम सेवा देता यावी या दृष्टीने पत्र सूचना कार्यालयाची- पीआयबीची सहाय्यकारी भूमिका’ या विषयावर एक सादरीकरण करतील.प्रत्येक व्याख्यानानंतर प्रश्नोत्तर सत्राचे आयोजन करण्यात आले आहे

        शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांसोबत संवाददेखील यावेळी आयोजित करण्यात आला आहे .

No comments

Powered by Blogger.