Header Ads

रमाई आवास घरकुल (शहरी) योजना - Ramai Awas Gharkul (Shahari) Yojana

रमाई आवास घरकुल (शहरी) योजना - Ramai Awas Gharkul (Shahari) Yojana


रमाई आवास घरकुल (शहरी) योजना

नगरपरिषदकडे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन 

       वाशिम, दि. 02 (जिमाका / www.jantaparishad.com) - रमाई आवास घरकुल (शहरी) योजना (Ramai Awas Gharkul (Shahari) Yojana) 9 मार्च 2010 रोजीच्या शासन निर्णयानुसार सुरू करण्यात आली आहे. शहरी भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील लोकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी रमाई आवास घरकुल (शहरी) योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचा जातीचा दाखला, रेशन कार्ड, 3 लक्ष रुपयापर्यंतचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला, 7/12 चा उतारा, पि.आर. कार्ड, विद्युत देयक, मतदान ओळख पत्र, 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतले नसल्याचे हमी पत्र आणि 15 मार्च 2016 रोजीच्या शासन निर्णयात नमूद केलेल्या सर्व अटी व शर्तीची पूर्तता करून विहित नमुन्यात प्रस्ताव आपल्या जवळच्या नगरपरिषद/पंचायतकडे सादर करावा.

         अधिक माहितीसाठी व अर्ज मिळण्याकरीता जवळच्या मुख्याधिकारी, नगरपरिषद/पंचायत (सर्व) किंवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, वाशिम यांच्याकडे संपर्क साधून या योजनेचा जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा. असे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त मारोती वाठ यांनी कळविले आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.