Header Ads

मसाला लागवड व जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन - Cultivation of spices and revival of old orchards

मसाला लागवड व जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन - Cultivation of spices and revival of old orchards


मसाला लागवड व जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन

महाडिबीटीवर शेतकऱ्यांनी अर्ज करावे

कृषी विभागाचे आवाहन

       वाशिम, दि. 02 (www.jantaparishad.com / जिमाका) :  एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत फळे, फुले, मसाला लागवड व जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन हे घटक राबविण्यात येत आहे. यामध्ये विदेशी फळे, फुले, मसाला लागवड, आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी या फळपिकांच्या जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन या बाबींचा समावेश आहे. जिल्हयात विदेशी फळे, फुले, मसाला या पिकांचे उत्पादन वाढविणे तसेच जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविणे यादृष्टीने कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

           या घटकांचे अनुदान पुढीलप्रमाणे आहे. 

फुले लागवड - कट फ़्लॉवर्स  

  1. अल्प भुधारक शेतकऱ्यांसाठी खर्च मर्यादा 1 लक्ष रुपये प्रति हेक्टर, अनुदान मर्यादा एकुण खर्चाच्या 40 टक्के किंवा जास्तीत जास्त 40 हजार रुपये प्रति हेक्टर. 
  2. इतर शेतकरी खर्च मर्यादा 1 लक्ष रुपये प्रति हेक्टर, अनुदान मर्यादा एकुण खर्चाच्या 25 टक्के किंवा 25 हजार रुपये प्रति हेक्टर, 

कंदवर्गीय फुले - 

  1. अल्पभुधारक शेतकऱ्यांसाठी खर्च मर्यादा 1 लक्ष 50 हजार रुपये प्रति हेक्टर, अनुदान मर्यादा एकुण खर्चाच्या 40 टक्के किंवा 60 हजार रुपये प्रति हेक्टर, 
  2. इतर शेतकऱ्यांसाठी खर्च मर्यादा 1 लक्ष 50 हजार रुपये प्रति हेक्टर, अनुदान मर्यादा एकुण खर्चाच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 37 हजार 500 रुपये प्रति हेक्टर, 

सुटी फुले - 

  1. अल्पभुधारक शेतकऱ्यांसाठी खर्च मर्यादा 40 हजार रुपये प्रति हेक्टर, अनुदान मर्यादा एकुण खर्चाच्या 40 टक्के किंवा जास्तीत जास्त 16 हजार रुपये प्रति हेक्टर.
  2. इतर शेतकऱ्यांसाठी खर्च मर्यादा 40 हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान मर्यादा एकुण खर्चाच्या 25 टक्के किंवा 10 हजार रुपये प्रति हेक्टर असे आहे.


मसाला पिक लागवड - 

  • बिया वर्गीय व कंद वर्गीय खर्च मर्यादा 30 हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान मर्यादा एकुण खर्चाच्या 40 टक्के 12 हजार रुपये प्रति हेक्टर.
  • मसाला पिके - बहुवर्षिय मसाला पिके खर्च मर्यादा 50 हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान मर्यादा एकुण खर्चाच्या 40 टक्के 20 हजार रुपये प्रति हेक्टर

विदेश फळपिक लागवड - 

  • ड्रॅगनफ्रुटसाठी खर्च मर्यादा 4 लक्ष रुपये प्रति हेक्टर अनुदान मर्यादा एकुण खर्चाच्या 40 टक्के किंवा जास्तीत जास्त 1 लक्ष 60 हजार रुपये प्रति हेक्टर, 
  • स्ट्रॉबेरी खर्च मर्यादा 2 लक्ष 80 हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान मर्यादा एकुण खर्चाच्या 40 टक्के किंवा जास्तीत जास्त 1 लक्ष 12 हजार रुपये प्रति हेक्टर, 
  • अवॅकॅडो खर्च मर्यादा 1 लक्ष रुपये प्रति हेक्टर अनुदान मर्यादा एकुण खर्चाच्या 40 टक्के किंवा जास्तीत जास्त 40 हजार रुपये प्रति हेक्टर  

जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन खर्च मर्यादा 40 हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान मर्यादा खर्चाच्या 50 टक्के व जास्तीत जास्त 20 हजार रुपये प्रति हेक्टर आहे.

          तरी जिल्हयातील विदेशी फळे, फुले, मसाला लागवड करण्यास इच्छुक व जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन करण्यासाठी आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी या फळपिकांच्या बागा असलेल्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा् अधिक्षक कृषि अधिकारी अनिसा महाबळे यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.