Header Ads

रासायनिक खताच्या किंमती जाहिर : Chemical Fertilizer Prices Announced

रासायनिक खताच्या किंमती जाहिर : Chemical Fertilizer Prices Announced


रासायनिक खताच्या किंमती जाहिर

पक्के बिल घेऊनच खरेदी करावे - कृषी विभागाचे आवाहन

      वाशिम, दि. 09 (जिमाका) :  रासायनिक खताच्या किंमती कमी झाल्याच्या बातम्या मागील दोन दिवसांपासून जिल्हयातील समाज माध्यमात व्हायरल होत आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी बांधवांमध्ये रासायनिक खतांच्या किंमती (Chemical fertilizer prices) बाबत संभ्रम निर्माण होऊ शकतो. अद्याप रासायनिक खताच्या किंमती कमी झाल्याची अधिकृत माहिती आलेली नाही. तरी जिल्हयातील शेतकरी बांधवांनी बियाणे, खते व किटकनाशके खरेदी करतांना परवानाधारक दुकानामधूनच पक्के बिल घेऊनच खरेदी करावी. असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रभारी कृषी विकास अधिकारी गणेश गिरी यांनी केले आहे.

        रासायनिक खताच्या किंमती सन 2023-24 करीता खतनिहाय पुढीलप्रमाणे आहे. 

Rates of Chemical Fertilizer Prices are as follows. 

  • DAP 18:46:00- 1350 रुपये प्रती बॅग, 
  • MOP 00:60:0- 17 रुपये बॅग, 
  • MP 24:24:0:0- 1500 रुपये ते 1700 रुपये, 
  • NPS 24:24:00:8- 1500 रुपये, 
  • NPS 20:20:0:13- 1200 रुपये ते 1300 रुपये, 
  • NPK 19:19:19- 1550 रुपये, 
  • NPK 10:26:26:0- 1470 रुपये, 
  • NPK 12:32:16- 1470 रुपये, 
  • NPK 14:35:14- 1500 रुपये, 
  • NP 14:28:00- 1650 रुपये ते 1700 रुपये, 
  • NP 20:20:00- 1175 रुपये, 
  • NPK 15:15:15- 1470 रुपये, 
  • NPS 16:20:0:13- 1150 रुपये ते 1470 रुपये, 
  • NPK 16:16:16:0- 1250 रुपये, 
  • NP 28:28:0:0- 1500 रुपये, 
  • AS 20:5:0:0:23- 1000 रुपये, 
  • NPKS 15:15:15:09- 1450 रुपये 1470 रुपये, 
  • NPK 17:17:17- 1210 रुपये, 
  • NPK 08:21:21- 1750 रुपये, 
  • NPK 09:24:24- 1790 रुपये, 
  • SSP 0:16:0:11- 490 रुपये ते 570 रुपये आणि 
  • SSP 0:16:0:12- 450 रुपये ते 530 रुपये 

असे आहे. 

        तरी जिल्हयातील शेतकऱ्यांनी वरील दराप्रमाणे खताची खरेदी करावी. रासायनिक खताच्या दराबाबत कोणताही संभ्रम ठेवू नये.       

No comments

Powered by Blogger.