Header Ads

UPSC Result 2023 Maharashtra 70 Candidates Selected - युपीएससी त महाराष्ट्रातील ७० हून अधिक उमेदवार यशस्वी

UPSC Result 2023 Maharashtra 70 Candidates Selected - युपीएससी त महाराष्ट्रातील ७० हून अधिक उमेदवार यशस्वी


केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रातील ७० हून अधिक उमेदवार यशस्वी

UPSC Result 2023 Maharashtra 70 Candidates Selected

UPSC 2023 Dr Kashmira Sankhe First in Maharashtra stood 25th IR

        नवी दिल्‍ली, २४ : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत देशातील एकूण 933 उमेदवार यशस्वी झाले आहेत. यापैकी राज्यातील 70 हून अधिक उमदेवारांनी घवघवीत यश मिळविले आहे. राज्यातून डॉ. कश्मिरा संखे प्रथम तर देशात तिने 25 वा क्रमांक पटकावला (Dr Kashmira Sankhe First in Maharashtra stood 25th IR) आहे.

        केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वर्ष 2022 च्या मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निकालात पहिल्या 100 उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील 7 पेक्षा जास्त उमेदवारांचा समावेश आहे.

(25) Kashmira Sankhe - First in Maharashtra 

(28) Ankita Puwar, 

(54) Rucha Kulkarni, 

(57) Aditi Vasharne, 

(58) Dikshita Joshi, 

(60) Sri Maliye, 

(76) Vasant Dabholkar, 

(112) Pratik Jared, 

(127) ) Janhvi Sathe, 

(146) Gaurav Kayande Patil, 

(183) Rishikesh Shinde, 

(214) Arpita Thube, 

(218) Soham Mandhare, 

(265) Divya Gunde, 

(266) Tejas Agnihotri, 

(277) Amar Raut, 

(278) Abhishek Dudhal, 

(281) Shrutisha Patade, 

(287) Swapnil Pawar, 

(310) Harsh Mandalik, 

(348) Himanshu Samant, 

(349) Aniket Hirde, 

(370) Sanket Garud, 

(380) Omkar Gundge 

(393) Parmanand Darade, 

(396) Mangesh Khillari, 

(410) Revaiya Dongre 

(445) Sagar Kharde, 

(452) Pallavi Sangle 

(463) Ashish Patil, 

(470) Abhijit Patil, 

(473) Shubhali Parihar, 

(493) Shashikant Narvade, 

(495) Deepak Yadav, 

(517) Rohit Karadam, 

(530) Shubhangi Kekan, 

(535) Prashant Dagle, 

(552) Lokesh Patil, 

(558) Ritwik Kotte, 

(560) Pratiksha Kadam, 

(563) Mansi Sakore, 

(570) Syed Mohammad Hussain. , 

(580) Parag Saraswat, 

(581) Amit Undirwade, 

(608) Shruti Kokate, 

(624) Anurag Ghuge, 

(635) Akshay Nerle, 

(638) Pratik Korde, 

(648) Karan More, 

(657) Shivam Burghate, 

( 663) Rahul Atram, 

(665) Ganpat Yadav, 

(666) Ketaki Borkar, 

(670) Pratham Pradhan, 

(687) Sumedh Jadhav, 

(691) Sagar Dethe, 

(693) Shivhar More, 

(707) Swapnil Dongre, 

(717) Deepak Katwa, 

(719) Rajshree Deshmukh, 

(750) Maharidra Bhor, 

(762) Akint Patil, 

(790) Vikram Ahirwar, 

(792) Vivek Sonwane, 

(799) Swapnil Saidane, 

(803) Saurabh Ahirwar, 

(828) Gaurav Ahirwar. , 

(844) Abhijay Pagare, 

(861) Tushar Pawar, 

(902) Dayanand Tendolkar, 

(908) Vaishali Dhande, 

(922) Nihal Kore.

एक नजर निकालावर

        केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी सप्टेंबर 2022 मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली.  जानेवारी-मे 2023 दरम्यान परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या परीक्षेच्या निकालातील उत्तीर्ण 933  उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. यामध्ये खुला (OPEN) गटातून –345, आर्थिक मागास प्रवर्गातून  (EWS) 99, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून(OBC) – 263, अनुसूचित जाती प्रवर्गातून (SC) – 154, अनुसूचित जमाती प्रवर्गातून (ST) – 72  उमेदवारांचा समावेश आहे. एकूण यशस्वी उमेदवारांमध्ये 41  दिव्यांग उमेदवारांचा (14 ऑर्थोपेडिकली अपंग, 07 दृष्टीहीन, 12 श्रवणदोष आणि 08 एकाधिक अपंग) समावेश आहे. लोकसेवा आयोगाने 178 उमेदवारांची आरक्षित सूची (Reserve List)  तयार केली आहे. यामध्ये  सामान्य गट- 89, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस)- 28,  इतर मागास वर्ग -52, अनुसूचित जाती- 05, अनुसूचित जमाती-04  उमेदवारांचा समावेश आहे.

या रिक्त पदांवर उमेदवार होतील रूजू

भारतीय प्रशासन सेवा (IAS) या सेवेत शासनाकडे एकूण -180 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (ओपन) – 75, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस)  18 इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) –45, अनुसूचित जाती (एस.सी.) – 29, अनुसूचित जमाती (एस.टी.) – 13  जागा रिक्त आहेत. उमेदवारांच्या गुणानुक्रमे रिक्त जागांवर यशस्वी उमेदवारांची निवड केली जाईल.

भारतीय विदेश सेवा (ISF) या सेवेत शासनाकडे एकूण – 38 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (ओपन) – 15, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 04,  इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) – 10, अनुसूचित जाती (एस.सी.) – 06, अनुसूचित जमाती (एस.टी.) – 03 जागा रिक्त आहेत.

भारतीय पोलिस सेवा (IPS) या सेवेमध्ये एकूण – 200 जागा रिक्त आहेत, यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 83,  आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 20,  इतर मागास प्रवर्गातून – 53, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 31, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 13  उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे.

केंद्रीय सेवा गट अ – या सेवेमध्ये एकूण – 473 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 201, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस)  45 , इतर मागास प्रवर्गातून – 122, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 69 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून –36  उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल.

केंद्रीय सेवा गट ब – या सेवेमध्ये एकूण – 131   जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 60, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस)  12 उमेदवार, इतर मागास प्रवर्गातून – 33, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 19   तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 07 उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.

एकूण  933 उमेदवारांपैकी 613 पुरुष आणि 320 महिलांची विविध सेवांमध्ये नियुक्तीसाठी आयोगाने शिफारस केली आहे, तर 101 उमेदवारांची निवड तात्पुरत्या स्वरुपाची  असेल.

निकाल व यशस्वी उमदेवारांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

No comments

Powered by Blogger.