Header Ads

३० मे पर्यंत कलम १४४ चे प्रतिबंधात्मक आदेश - Prohibitory order of Section 144 till May 30

३० मे पर्यंत कलम १४४ चे प्रतिबंधात्मक आदेश - Prohibitory order of Section 144 till May 30


३० मे पर्यंत कलम १४४ चे प्रतिबंधात्मक आदेश

       वाशिम, दि. 17 (जिमाका) : जिल्हा जातीय व राजकीयदृष्टया संवेदनशील आहे. मागील काळात सामाजिक माध्यमाव्दारे आक्षेपार्ह संदेश प्रसारीत झाल्याने पोलीस स्टेशन कारंजा शहर, अनसिंग, जऊळका, मालेगांव व शिरपूर येथे वेगवेगळया कारणावरुन जातीय तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतू सद्यस्थितीत जातीय सलोखा कायम असून जिल्हयात शांतता आहे. 

            आगामी काळात एखाद्या व्यक्तीकडून आक्षेपार्ह संदेश/ व्हिडीओ प्रसारीत झाल्यास जातीय सलोखा आणि कायदा व सुव्यवस्था बाधीत होऊ नये. जिल्हयात शांतता अबाधित राहावी यासाठी 30 मे पर्यंत फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 चे प्रतिबंधात्मक आदेश (Prohibitory order of Section 144 till May 30) जिल्हादंडाधिकारी षण्मुगराजन एस. (DM Shanmugarajan S.) यांनी लागू केले आहे. या आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्तींविरुध्द कारवाई करण्यात येईल. असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.     

No comments

Powered by Blogger.